शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
5
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
6
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
7
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
8
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
9
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
10
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
11
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
12
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
13
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
14
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
15
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
16
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
17
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
19
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
20
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया

ठाण्यात एटीएमसह १७.९६ लाखांची चोरी: उल्हासनगरमधून पाचव्या तर सहाव्या आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:52 AM

एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणाऱ्या आठ जणांच्या टोळीपैकी आणखी एकाला उल्हासनगरमधून तर दुस-याला उत्तरप्रदेशातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. या टोळीकडून चार लाख ४० हजार ९०० ची रोकड, मोटारकार आणि एटीएम संच हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार लाख ४० हजारांच्या रोकडसह सात लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्तआणखी दोघांचा शोध सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दहिसर गावातील एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणा-या आठ जणांच्या टोळीपैकी आणखी एकाला उल्हासनगरमधून तर दुसºयाला उत्तरप्रदेशातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. या सर्वच टोळीकडून चार लाख ४०हजार ९०० ची रोकड आणि मोटरकार असा सात लाख ४० हजार ९०० चा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे तालुक्यातील दहिसर ग्रामपंचायतीजवळील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रातील एटीएम संच हे १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह ८ जून रोजी चोरण्यात आले होते. याप्रकरणी डायघर पोलिसांबरोबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे पथकही समांतर तपास करीत असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अतुल दवणे, सूरज म्हात्रे , दादासाहेब उर्फ सूरज कांबळे आणि फुलाजी गायकर या ११ जून रोजी अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार दत्तत्रय सरक, रवींद्र काटकर, पोलीस नाईक संजय बाबर आणि महापुरे आदींच्या पथकाने उल्हासनगर येथून १२ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारा या टोळीतील पाचवा आरोपी रशिरौफ सय्यद (३५, रा. उल्हासनगर, कॅम्प क्रमांक ३) याला अटक केली. तर टोळीच्या सूत्रधारापैकी एक भीमा बहाद्दूर जोरा हा नेपाळमध्ये पळून जाण्याच्या बेतात असतांना उत्तरप्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस उपअधीक्षक पी. के. मिश्रा यांच्या पथकाने त्याला उत्तरप्रदेशातील कानपूर भागातून ११ जून रोजी ताब्यात घेतले. त्यालाही सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, विक्रांत कांबळे आणि दादा पाटील यांच्या पथकाने १२ जून रोजी उत्तरप्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. टोळीतील उर्वरित दोघांनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास या पथकाने व्यक्त केला आहे.* अशी मिळाली रोकडअटकेतील आरोपींपैकी सुरेश म्हात्रे याच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड , फुलाजी गायकर याच्याकडून ४७ हजार ५०० तर सूरज कांबळे याच्याकडून एक लाख ८३ हजार ४०० अशी चार लाख ४० हजार ९०० ची रोकड आणि म्हात्रे याच्या घराच्या समोरुन चोरीसाठी वापरलेली तीन लाखांची मोटारकार आणि हाजीमलंग डोंगराजवळील एका खदाणीतून एटीएम संच असा सात लाख ४० हजार ९०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी