शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मुंब्रा येथील १६ हजार विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा; इत्तेहाद वेल्फेअर ट्रस्टचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:17 AM

४० टक्के शाळांकडून तीन महिन्यांच्या फीमाफीची घोषणा

कुमार बडदेमुंब्रा : येथील ४० टक्के खाजगी शाळांनी सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाची तीन महिन्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा तसेच प्रयोगशाळा, टर्म फी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे पैसे न घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे या शाळांमधून सध्या आॅनलाइन पद्धतीने ज्ञानार्जन करीत असलेल्या तब्बल १६ हजार विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक जणांवर बेकारीची कुºहाड कोसळली असून काहींच्या पगारात कपात झाली आहे. यामुळे इतकी वर्षे पाल्यांची नियमित फी भरत असलेले पालक यावर्षीची फी भरू शकत नाहीत. यामुळे फी आकारणीवरून अनेक शाळा आणि पालकांमध्ये वादविवाद सुरू आहेत. हा तिढा सामोपचाराने सुटावा, यासाठी अलीकडेच इत्तेहाद आणि सुलताना वेल्फेअर ट्रस्ट या सामाजिक संस्थांनी शाळा संस्थापक, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या शाळा व्यवस्थापकांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फी माफीबाबत निर्णय जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शनिवारी संध्याकाळपर्यंत येथील ७८ पैकी २७ खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांनी लॉकडाऊनदरम्यानची तीन महिन्यांची संपूर्ण फी माफ करण्याचे तसेच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजचे पैसे विद्यार्थ्यांकडून घेणार नसल्याचे आश्वासन दिले. फीमाफीच्या या दिलाशाने सध्या कोरोनाच्या संकटात आर्थिक गणिते जुळवताना चाचपडणाऱ्या पालकांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फी बाबत शाळा व्यवस्थापकांना करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या शाळांनी फी माफ करण्याचे आश्वासन दिले आहे, त्या शाळांप्रमाणेच उर्वरित शाळांनीही फी माफीचा निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा.- शमिम खान, अध्यक्ष, इत्तेहाद वेल्फेअर ट्रस्ट

टॅग्स :Schoolशाळा