शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:55 IST

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे.

ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये १६० जणांचा मृत्यू झाला असून ११८ जण जखमी झाले आहेत. यात लोकलमधून पडल्याच्या सुमारे १०० घटनांचा समावेश असून त्यात ७७ जण जखमी झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा रेल्वेस्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत अशी पसरली आहे. ठाण्यातून रेल्वेने दररोज सातआठ लाख प्रवासी येजा करतात. तसेच सकाळी आणि सायंकाळी अक्षरश: लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना हे अपघात होताना प्रामुख्याने दिसून येत आहे.जानेवारी ते २३ आॅगस्ट या आठ महिन्यांत रेल्वे अपघातांत १६० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाला आहे. तर, १७ जणांचा लोकल प्रवासादरम्यान पडून आणि एकाचा खांब लागल्याने तसेच दोघे गॅपमध्ये पडून दगावले आहेत. तसेच ११८ जण रेल्वे अपघातांत जखमी झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७७ जण लोकल प्रवासादरम्यान पडल्याने जखमी झाले आहेत. तर, २७ जण रेल्वेची धडक लागल्याने जखमी झाले आहेत. या अपघातांतील १९ मयतांच्या वारसांचा शोध लागला नसल्याने ते अद्यापही बेवारस असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

टॅग्स :localलोकलDeathमृत्यूthaneठाणेAccidentअपघात