आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका

By अजित मांडके | Updated: February 16, 2023 09:53 IST2023-02-16T09:53:16+5:302023-02-16T09:53:58+5:30

ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

15 people trapped in the building due to fire were rescued safely | आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका

आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका

ठाणे : सेंट जॉन स्कूलसमोर असलेल्या तळ अधिक ३ मजली गुरूप्रेरणा या इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत सुखरूप सुटका केली आहे. 

ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मार्फत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०३-फायर वाहन व ०१-रेस्क्यू वाहन व ०१-वॉटर टँकरसह, ०१- जंबो वॉटर टँकरला पाचारण केले आहे.

Web Title: 15 people trapped in the building due to fire were rescued safely