ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1995 नव्या रुग्णांसह आतापर्यंत दीड लाख बाधीत; केडीएमसी परिसरात सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 09:03 PM2020-09-18T21:03:28+5:302020-09-18T21:03:39+5:30

आज ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 409 नवे रुग्ण आज सापडले आहेत. यासह शहरात 32 हजार 82 रुग्णांची आजपर्यंत नोंद आली आहे.

1.5 lakh infected with 1995 new corona patients in Thane district so far; Most in KDMC area | ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1995 नव्या रुग्णांसह आतापर्यंत दीड लाख बाधीत; केडीएमसी परिसरात सर्वाधिक 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1995 नव्या रुग्णांसह आतापर्यंत दीड लाख बाधीत; केडीएमसी परिसरात सर्वाधिक 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 995 रुग्णांचा शोध शुक्रवारी घेण्यात आहे. या रुग्णांसह एक लाख 55 हजार 134 रुग्णांची जिल्ह्यात आजपर्यंत नोंद घेण्यात आली आहे. तर आज 29 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात चार हजार 82 मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. 

 आज ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 409 नवे रुग्ण आज सापडले आहेत. यासह शहरात 32 हजार 82 रुग्णांची आजपर्यंत नोंद आली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या 922 झाली आहे. कल्याण - डोंबिवली (केडीएमसी) मनपा परीसरात आज सर्वाधिक 591रुग्ण नव्याने आढळून आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत सर्वाधिक 37 हजार 831बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर 757 मृतांची आजपर्यंत नोंद करण्यात आली आहे.  

                नवी मुंबई मनपा क्षेत्रात 368 नव्या रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण आज दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 32 हजार 371, तर, मृत्यूची संख्या 685 वर गेली आहे. उल्हासनगरला 71 रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत आठ हजार 545 बाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर आज तीन मृत्यू झाल्यामुळे 265 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.  

             भिवंडी मनपा. कार्यक्षेत्रात 37 रुग्ण नव्याने सापडले असून एकाच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह आजपर्यंत चार हजार 665 बाधीतांची, तर, 298 मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रात आज 192 रुग्णांची तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात आतापर्यंत बाधीतांची संख्या 16 हजार 211 झाली असून मृतांची संख्या  505 वर गेली आहे. 

            अंबरनाथ शहरात 57 रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता पाच हजार 718 बाधीत तर, 213 मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये 91रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण पाच हजार 402 झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या 73 कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राही 179 रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. या गांवपाड्यांत आतापर्यंत 12 हजार 309 बाधीत रुग्णांची, तर, 364 मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

Web Title: 1.5 lakh infected with 1995 new corona patients in Thane district so far; Most in KDMC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.