शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

जिल्ह्यातील आरटीईच्या शालेय प्रवेशासाठी १४७२० अर्ज ग्राह्य ; सात हजार अर्ज नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 6:41 PM

जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश आरक्षित ठेवले आहे. यासाठी पालकांनी २१ हजार ६५० अर्ज आजपर्यंत आॅनलाइन दाखल केले. त्यातील सहा हजार ९३० अर्ज रद्द ठरवलेले आहेत.

ठळक मुद्देगरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेशजिल्ह्यातील ६५२ उच्च दर्जाचे, चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेशनवीन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ३० मार्च ही मुदत वाढ

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील ६५२ उच्च दर्जाचे, चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. या जागी प्रवेश मिळवण्यासाठी २१ हजार ६५० अर्ज दाखल झाले. पण त्यातील केवळ १४ हजार ७२० प्रवेश अर्ज ग्राह्य धरले आहेत. उर्वरित सहा हजार ९३० अर्ज रद्द केले. या रद्द ठरलेल्या अर्जांमध्ये संबंधीत पालकानी योग्य दुरूस्ती त्वरीत करणे अपेक्षित आहे. याशिवाय नवीन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ३० मार्च ही मुदत वाढ देण्यात आली आहे.जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश आरक्षित ठेवले आहे. यासाठी पालकांनी २१ हजार ६५० अर्ज आजपर्यंत आॅनलाइन दाखल केले. त्यातील सहा हजार ९३० अर्ज रद्द ठरवलेले आहेत. या रद्द केलेल्या अर्जात योग्य ती दुरूस्ती करून पालकानी ते पुन्हा आॅनलाइन दाखल करता येतील. सीनिअर केजीसाठी जागा नसलेल्या शाळाना बहुतांशी पालकांनी पसंती दिली आहे. त्यामुळेच सुमारे ९९ टक्के अर्ज रद्द ठरल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.आपला प्रवेश अर्ज ग्राह्य धरला की नाही, याची खातरजमा संबंधीत पालकांनी त्वरीत करण्याची अपेक्षा आहे. ग्राह्य न धरलेल्याअर्जातील दुरूस्तीसह योग्य पसंतीच्या शाळा पालकांनी नमुद करून ते अर्ज पुन्हा आॅनलाइन संमिट करण्याची संधी या पालकांना देण्यात आली आहे. या आधी अर्ज न केलेल्या पालकांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन पाल्याचा प्रवेश अर्ज त्वरीत आॅनलाइन करणे अपेक्षित आहे.पालकांनी हा प्रवेश अर्ज www.student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दाखल करणे आवश्यकआहे. जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये होणा-या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के शालेय प्रवेश आरटीईव्दारे दिले जात आहे. त्यासाठी या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. या आरक्षित ठेवलेल्या १३ हजार ४०० प्रवेशापैकी ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात दिले जाणार आहे. तर एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीत दिले जाणार आहेत. म्हणजे केजीत प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा