ठाण्यात १४ नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक; नियंत्रण कक्षातील दोघांचा तर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तीन निरीक्षकांचा समोवश

By जितेंद्र कालेकर | Published: February 2, 2024 10:52 PM2024-02-02T22:52:17+5:302024-02-02T22:52:25+5:30

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस ठाण्यांमध्ये नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संधी मिळाली आहे.

14 new senior police inspectors in Thane | ठाण्यात १४ नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक; नियंत्रण कक्षातील दोघांचा तर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तीन निरीक्षकांचा समोवश

ठाण्यात १४ नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक; नियंत्रण कक्षातील दोघांचा तर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तीन निरीक्षकांचा समोवश

ठाणे: ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस ठाण्यांमध्ये नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संधी मिळाली आहे. यात नियंत्रण कक्षातील दोघांचा तर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तीन निरीक्षकांचा समोवश आहे.

ठाण्याच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी शुक्रवारी हे आदेश काढले. ठाणे नियंत्रण कक्षातील निशिकांत विश्वंकार यांना कोनगाव, तर रणजित डेरे यांना कोपरी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी संधी मिळाली. मुंब्रा पोलिस ठाण्याचे संजय पवार आता विष्णुनगर, अतिक्रमणचे विजय कादबाने मानपाडा, भिवंडी शहरचे विजयकुमार कदम यांना टिळकनगर तर ठाणे नगरच्या शुभदा शितोळे यांची बदलापूर पूर्वला बदली झाली.

वाहतूक शाखेचे अशोक उतेकर - कळवा, अजय आफळे - भोईवाडा तर बदलापूरचे अनिल पडवळ विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे योगेश आव्हाड यांची कापूरबावडी पोलिस ठाण्यात बदली केली. याशिवाय, पिपरी चिंचवडमधून आलेल्या ज्ञानेश्वर साबळे- मुंब्रा, शिवाजी गवारे वागळे इस्टेट, तर सोलापूरच्या राजकुमार वाघचवरे यांची वर्तकनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

Web Title: 14 new senior police inspectors in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.