शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बंदच्या दिवशी १३०० कर्मचाऱ्यांनी लावली हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:40 PM

भाजपाप्रणित कामगार संघटनेवर कारवाईची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

मीरा रोड : भाजपाप्रणित कामगार संघटनेने मंगळवारी महापालिकेत केलेल्या बंदच्या दिवशी १९०० पैकी तब्बल १३०० कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक यंत्राद्वारे आपली हजेरी लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दबावाखाली कामावर हजर होऊ न देणाºया भाजपा प्रणित कामगार संघटनेवर कारवाई करा अशी तक्रार विरोधी पक्षनेते राजू भोईर यांनी आयुक्तां कडे केली आहे. कर्मचाºयांनी लावलेली हजेरी पाहता तेही बंदच्या विरोधातच होते असे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रभागात भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत पालिकेने अशी कारवाई केल्याने सरनाईक यांनी विभागप्रमुख दादासाहेब खेत्रे यांना खडसावले होते. संतप्त जमावातून शिविगाळ झाली तर दगड मारून पोकलेनची काच तोडली. आमदार नरेंद्र मेहता व ते अध्यक्ष असलेल्या श्रमिक जनरल कामगार संघटनेने खेत्रे यांना मारहाण झाल्याचे सांगत सरनाईकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत मंगळवारी पहाटे परिवहन सेवा भाजपाच्या संघटनेने बंद पाडली. तर पालिका मुख्यालय, प्रभाग समिती आदी सर्व कार्यालयात काम बंद आंदोलन केले. शिवसेनेच्या संघटनेचे अनेक कर्मचारी मात्र कामावर हजर होते. अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरले, पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सत्यकाम फाऊंडेशन, जिद्दी मराठा संस्था आदींनी संपकरी कर्मचाºयांवर कारवाईची लेखी तक्रारच पालिका आयुक्तांपासून सरकारकडे केली आहे. भोईर यांनी भाजपा प्रणित कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर कारवाईची मागणी केली आहे. कामावर येऊ इच्छिणाºया कर्मचाºयांना बळजबरी हजर होऊ दिले नाही. राजकीय दबावाखाली कर्मचाºयांनी मुकाट्याने दडपशाही सहन केली असे भोईर म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील वाद वाढत असून भविष्यात तो वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कामगारांचा मनापासून पाठिंबा नव्हतामंगळवारी हजेरी लावणाºया कर्मचाºयांची संख्या पाहिली तर स्पष्ट होते की भाजपाच्या बेकायदा व राजकीय स्वार्थाच्या बंदला कर्मचाºयांचा मनापासून पाठिंबाच नव्हता. कारण त्या दिवशी कायम, कंत्राटी व मानधनावरील १९०५ कर्मचाºयांपैकी तब्बल १ हजार २२३ कर्मचाºयांनी हजेरी लावली होती.त्यातही बायोमेट्रिक मशीन नादुरूस्त असल्याने काही जलकुंभावरील ६१ कर्मचारी तर इंदिरा गांधी रूग्णालयातील ३० कर्मचाºयांची हजेरी नोंद झाली नाही. त्यामुळे हे ९१ कर्मचारी वगळता केवळ ५९१ कर्मचाºयांचीच गैरहजर म्हणून नोंद आहे. त्यामुळे भाजपा प्रणित कामगार संघटनेने केलेल्या बंदमध्ये कर्मचारी नाईलाजाने सहभागी झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे असा दावा भोईर यांनी केला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा