शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहितेसाठी 13 पथकं तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 7:45 PM

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने १३ पथकं नेमण्यात आली आहेत.

मीरा रोड - मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने १३ पथकं नेमण्यात आली आहेत. त्यात ४ भरारी पथकं, ४ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम व ३ व्हिडीओ सर्व्हिलन्स टीमचा समावेश आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सकाळी ८ ते रात्री ८ अशी दोन तर रात्री ८ ते सकाळी ८ अशी दोन मिळून ४ भरारी पथकं आचारसंहिता उल्लंघनाच्या कारवाईसाठी तैनात आहेत. त्यातच धर्तीवर सकाळी व रात्री अशा दोन पाळ्यां मध्ये ४ स्टॅटिक सर्व्हिलन्स टिम शहरातील प्रमुख नाक्यांवर वाहन आदींच्या तपासणीसाठी तैनात केलेली आहेत.तर जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रा आदींचे छायाचित्रण करण्यासाठी ३ व्हिडिओ सर्व्हिलेन्स टीम नियुक्त केल्या गेल्या आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथकं कार्यरत असून मुख्यालयात एक पथक छायाचित्रण पाहण्यासह खर्चाचा समावेश आदी काम करत असल्याचे पाटील म्हणाले.आचार संहिता प्रमुख म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची नियुक्ती केली गेली आहे. सर्व पथकांना वाहन आदी सुविधा देण्यात आली असून, प्रत्येक पथकात अधिकारी, पोलीस आदींचा समावेश असल्याचे आचार संहिता पथकांचे नोडल अधिकारी असलेले सुनील यादव म्हणाले. तक्रारी आल्यावर पथकांना घटनास्थळी रवाना केले जात असुन त्यांच्या अहवाला नंतर आवश्यक कार्यवाहीचा निर्णय घेतला जात असल्याचे ते म्हणाले.