मीरा भाईंदर मध्ये दोन दिवसात १२१ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 20:56 IST2021-02-21T20:55:20+5:302021-02-21T20:56:00+5:30
मीरा भाईंदर मध्ये शनिवारी ६५ तर रविवारी ५६ असे दोन दिवसात १२१ कोरोना रुग्ण आढळून आल्याने वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली

मीरा भाईंदर मध्ये दोन दिवसात १२१ कोरोना रुग्ण
मीरा भाईंदर मध्ये शनिवारी ६५ तर रविवारी ५६ असे दोन दिवसात १२१ कोरोना रुग्ण आढळून आल्याने वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे.
रविवार २१ फेब्रुवारी पर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ७८६ इतकी झाली आहे. सध्या ४२३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोना मूळे ८०२ रुग्ण आता पर्यंत मृत्युमुखी पडले आहेत.
मध्यंतरी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. परंतु सर्व व्यवहार सुरू झाले असताना बेजबाबदार नगरसेवक, राजकारणी , नागरिक व व्यावसायिकांनी मात्र मास्क घालण्यासह अनेक नियमांचे सर्रास उल्लंघन चालवले आहे. जेणे करून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे.