ठाण्यातील बारावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: February 7, 2023 21:05 IST2023-02-07T21:03:25+5:302023-02-07T21:05:32+5:30

कापूरबावडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.

12 th student in thane committed suicide by hanging herself | ठाण्यातील बारावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

ठाण्यातील बारावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: वैफल्यग्रस्त झालेल्या एका पूजा रवीभूषण तिवारी या १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.

मनोरमा नगर, रामवाडी, शंकर मंदिराच्या बाजूला एका चाळीमध्ये राहणारी पूजा ठाणा कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकते. मंगळवारी तिचे वडिल कामाला बाहेर गेले होते. तर आई कामानिमित्त घराबाहेर होती. १४ वर्षीय लहान भाऊही खेळण्यासाठी गेला होता. त्याचवेळी पूजाने ओढणीने घरात गळफास घेतल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिला कुटूंबीयांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 12 th student in thane committed suicide by hanging herself