उल्हासनगरात आज १२ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७६११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 21:01 IST2020-08-25T20:28:13+5:302020-08-25T21:01:40+5:30
उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३३ आहे.

उल्हासनगरात आज १२ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७६११
उल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे १२ रुग्ण आढळले तर ४ जणाचा मृत्यू झाला. एकून मृतांची संख्या २१७ झाली असून आज ५ जणांनी कोरोनावर मात केली. एकून कोरोना रुग्णाची संख्या ७६११ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ७०९१ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३३ आहे. त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड सेंटर मध्ये १६०, होम आयलोशन मध्ये ४२, तर शहारा बाहेरील रूग्णालयात १३३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१६ टक्के आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने महापालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.