शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुंब्य्रातून ११ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 9:58 PM

कर्ज फेडण्यासाठी मुंब्य्रातील तरुणांनी भलताच ‘उद्योग’ सुरु केला. घरातच एका प्रिंटरवर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करुन त्यांची विक्री करणाऱ्या मुजमिल मोहंमद साल्हे सुर्वे याच्यासह चौघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांनी आतापर्यंत १२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या असून त्यातील ४५ हजार रुपये बाजारात वटविल्याचे पोलिसांना सांगितले.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई एक लाखांमध्ये दोन लाखांच्या बनावट नोटांची विक्रीचौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लॉकडाऊनमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी मुंब्य्रातील तरुणांनी भलताच ‘उद्योग’ सुरु केला. घरातच एका प्रिंटरवर बनावट भारतीय चलनी नोटा तयार करुन त्यांची विक्री करणाºया मुजमिल मोहंमद साल्हे सुर्वे (४०, रा. मुंब्रा), मुजफ्फर शौकत पावसकर (४१,अंधेरी, मुंबई), प्रवीण परमार (४३, साकीनाका, मुंबई) आणि नसरीन इम्तियाज काझी (४१, रा. मुंब्रा) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ काहीजण भारतीय चलनातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपये दराच्या हुबेहुब वाटणाºया परंतू, बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, संजय भिवणकर आणि पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा लावून मुजम्मील सुर्वे याच्यासह चौघांना १८ नोव्हेंबर रोजी ११ लाख ४९ हजाराच्या बनावट नोटांसह अटक केली. जप्त केलेल्या नोटांमध्ये २००, ५०० आणि दोन हजारांच्या नविन नोटांचा समावेश आहे. या चौकडीकडे मिळालेल्या एका बॅगेमध्ये ११ लाख ४९ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत. परमार आणि मुजफ्फर यांनी या नोटांची मरोळ येथील घरी छपाई केली असून त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.--------------------कर्ज परतफेडीसाठी भलताच ‘उद्योग’लॉकडाऊनच्या काळात कोणताच कामधंदा नसल्यामुळे सुरुवातीला परमार आणि मुजफ्फर यांनी दहा रुपयांची नोट एका प्रिंटरवर छापून ती वटविली. नतर दोन हजारांच्या नोटेची त्यांनी अशीच पडताळणी केली. त्यांनी आतापर्यंत १२ लाख रुपयांच्या नोटा छापल्या. त्यातील ४५ हजार रुपये बाजारात वटविल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून दोनशे रुपयांच्या १५, पाचशेच्या ९४८ तर दोन हजारांच्या ३३६ बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. प्रविण याने मुजफ्फर याच्या स्कॅनर प्रिंटरच्या सहाय्याने बॉन्ड पेपरचा वापर करुन या नोटा बनविल्या. त्या मुंब्रा, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात वटविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या चौघांनाही ठाणे न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र