धक्कादायक ! खंडणीसाठी अपहरण केलेल्या 10 वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 09:51 IST2017-11-14T09:49:26+5:302017-11-14T09:51:44+5:30

मीरा रोड येथे 10 वर्षाच्या मुलाची सुरुवातीला गळा दाबून व त्यानंतर दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

The 10 year old boy kidnapped for ransom | धक्कादायक ! खंडणीसाठी अपहरण केलेल्या 10 वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या

धक्कादायक ! खंडणीसाठी अपहरण केलेल्या 10 वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या

मीरा रोड - मीरा रोड येथे 10 वर्षाच्या मुलाची सुरुवातीला गळा दाबून व त्यानंतर दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रितेश बबूल सिंह असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. खंडणीसाठी रितेशची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रितेशचं 12 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास अपहरण करण्यात आले आहेत.  यानंतर मंगळवारी पहाटे त्याचा मृतदेहच पोलिसांना सापडला.

रितेशची हत्या केल्यानंतर भाईंदरमधील आझादनागर झोपडपट्टी परिसरात निर्जनस्थळी त्याचा मृतदेह फेकण्यात आला. मंगळवारी (14 नोव्हेंबर )पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पवई पोलिसांनी नवघर पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  संतोष सिंह, अमर सिंह व लालू सिंह अशी आरोपींची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे संतोष सिंह हा रितेशचा चुलत काका असून अमर सिंह हा रितेशच्या गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: The 10 year old boy kidnapped for ransom