10 lakh students did 1.31 lakhs Surya namskar | 10 हजार विद्यार्थ्यांनी घातले सव्वा लाख सूर्यनमस्कार 
10 हजार विद्यार्थ्यांनी घातले सव्वा लाख सूर्यनमस्कार 

कल्याण : सुभेदारवाडा कट्टा व महिला बालकल्याण समिती, कल्याण-डोंबिवली महापालिका, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना व क्रीडाभारती कल्याण यांच्यातर्फे राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त गुरुवारी, 24 जानेवारीला 10 हजार १२१ विद्यार्थ्यांनी एक लाख ३१ हजार ५७३ सूर्यनमस्कार घातले.

सुभाष मैदान, अत्रे रंगमंदिराजवळ, कल्याण (प.) येथे सकाळी हा कार्यक्रम झाला. कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चाैधरी, व सर्व सदस्या उपस्थित होत्या. मुख्याध्यापक संघटनेचा गुलाबराव पाटील, सरस्वती हायस्कूलचे अंकुश चाैधरी, लुड्स हायस्कूलचे विलास वाघ, श्री छत्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विलास वाघ, क्रीडाभारतीचे सचिव महादेव क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य मिळाले. 

विशेष म्हणजे, यावेळी आ. नरेंद्र पवार, नगरसेविका खुशबू चौधरी, संगीता गायकवाड, दमयंती वझे, शिक्षक विलास निखारे यांनीही सूर्यनमस्कार घातले.

Web Title: 10 lakh students did 1.31 lakhs Surya namskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.