शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निधीतून १० कोटींचा कट्ट्यांचा घाट!,भाजपाच्या नगरसेवकांकडून आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 18:54 IST

Thane : शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या मुद्याला हात घातला. महापौर निधी कशा प्रकारे वापरला जाणे अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाणे  : शहरातील अत्यावश्यक सेवांसाठी निधी मिळत नसतांना, त्यांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत थांबविले जात असतांना, महापौर निधीतून शहराच्या विविध भागात तब्बल १० कोटींचा चुराडा करुन कट्ट्ये बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाच्या नगरसेवकांनी केला. परंतु महापौर निधी कसा आणि कुठे वापरायचा याचा सर्वस्वी अधिकार महापौरांना असल्याचे मत शिवसेनेच्या नगरसेवकांनी मांडले. मात्र, हे कट्टे बांधून त्याचा उपयोग काय, असा सवाल करीत ठाणेकरांच्या पैशांची उधळपटटी करण्याचाच हा प्रकार असल्याचा टोलाही भाजपाच्या नगरसेवकांनी लगावला.

शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या मुद्याला हात घातला. महापौर निधी कशा प्रकारे वापरला जाणे अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परंतु महापौर महोदय आपल्या मर्जीतील नगरसेवकांसाठीच जास्तीचा निधी देत असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी सभागृहासमोर दिली. त्यामुळे नियम काय सांगतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर महापालिकेने महापौर निधी वापरण्याचे अधिकार हे महापौरांचे आहेत, तो कसा वापरायचा कोणाला द्यायचा हे अधिकार देखील त्यांचेच असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु भाजपच्या नगरसेवकांना हा मुद्दा रास्त वाटला नाही. त्यांनी थेट महापौर निधीतून केल्या जाणाऱ्या कामांवरच थेट बोट ठेवत त्यावरच आक्षेप नोंदविला. 

दुसरीकडे, भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी तर महापौर निधीचा कसा चुकीच्या पध्दतीने वापर सुरु आहे, याचे उदाहरणच सभागृहासमोर आणले. महापौर निधीतून महत्वाची कामे शहरात होणे अपेक्षित असतांना शहराच्या विविध भागात १० कोटींचे कट्टे बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे कट्टे केवळ बसण्यासाठी असणार आहेत. परंतु एका कट्ट्यांसाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार असून त्याठिकाणी काय सोन्याचा मुलामा लावला जाणार आहे का? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी शिवसेना नगरसेवकांना चक्रावुन सोडल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे शहरातील इतर काही महत्वाची अत्यावश्यक कामे शिल्लक आहेत, ती कामे व्हावीत, यासाठी इतर नगरसेवक प्रयत्न करीत आहेत, परंतु कोरोनामुळे निधी नसल्याचे कारण देत या कामांसाठी निधी नसल्याचे सांगितले जात आहे. अत्यावश्यक कामांना निधी मिळत नसतांना या कट्ट्यांसाठी निधी कसा मिळतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.त्यामुळे शिवेसनेचे नगरसेवक आणखीनच संतप्त झाल्याचे दिसून आले. 

महापौरांनी कोणाला निधी द्यायचा, कीती निधी द्यायचा हा अधिकार त्यांचा असल्याचे मत स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी व्यक्त केले. परंतु भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याने अखेर सभापती संजय भोईर यांनी महापौर निधीच्या खर्चाबाबतचा अधिकार हा त्यांचा असल्याने त्यावर भाष्य करणो अयोग्य असल्याचे सांगत हा विषय थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा वाद काहीसा शमला असला तरी महासभेत या विरोधात जाब विचारला जाणार असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महापौरांच्या वॉर्डात १०० कोटींचे काममागील दोन वर्षापासून कोपरीतील कोपरी प्रसुतीगृहासाठी १० लाखांच्या निधीची मागणी केली जात आहे, त्याची फाईलही मंजुर आहे. काही दिवसांपूर्वी या प्रसुतीगृहातील एका बाजूचा स्लॅबही पडला आहे. दुसरीकडे बारा बंगला परिसरातील रस्त्याच्या कामासाठी ५ कोटींच्या निधीची फाईलही तयार आहे, निधीही मंजुर झाला आहे. परंतु त्यासाठी देखील आता निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. असे शहरात इतर ठिकाणी देखील महत्वाची अत्यावश्यक कामे असून त्यासाठी निधी दिला जात नाही. मात्र महापौरांच्या वॉर्डात कामांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर कसा झाला असा सवालही आता भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपा