उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकाने पकडली १ कोटी ८ लाखाची रोकड

By सदानंद नाईक | Published: April 6, 2024 05:03 PM2024-04-06T17:03:21+5:302024-04-06T17:03:33+5:30

आयकर विभागाकडे तपास, वाहन पोलीस ठाण्यात.

1 crore 8 lakh cash was seized by the code enforcement team in ulhasnagar | उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकाने पकडली १ कोटी ८ लाखाची रोकड

उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकाने पकडली १ कोटी ८ लाखाची रोकड

सदानंद नाईक,उल्हासनगर : निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने शुक्रवारी रात्री ९ वाजता धोबीघाट परिसरातून १ कोटी ८ लाखाची रोकड घेऊन जाणारी एसएमएस नावाचे वाहन जप्त केले. भरारी पथकाने उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात वाहन दिले असून याप्रकरणी आयकर विभाग तपास करीत असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली आहे. 

उल्हासनगरात कॅम्प नं-१, घोबीघाट परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजता एटीएमची रोकड वाहून नेणाऱ्या एका एसएसएम नावाच्या वाहनांची निवडणुक आचारसंहिता भरारी पथकाचे प्रमुख अजित घोरपडे, सहायक भरारी प्रमुख सचिन कदम आदींच्या पथकाने झाडाझडती घेतली असता, वाहनात १ कोटी ८ लाखाची रोकड सापडली. पथकाने रोकडबाबत वाहन चालकाला विचारणा केली असता, एटीएमची रोखड असल्याची माहिती त्याने दिली. मात्र त्याबाबत कोणताही पुरावा देऊ शकला नसल्याने, रोकडसह वाहन उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी आयकर विभागाला लेखी कळविले असून आयकर विभाग रोकडबाबत तपास करीत आहेत. 

लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळात महापालिका शाळा क्रं-२९ मध्ये व अन्य ठिकाणी शिलाई मशीन व घरघंटी यंत्र वाटप प्रकारचा भांडाफोड झाला. महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापाठोपाठ १ कोटी ८ लाखाची रोकड आचारसंहिता भरारी पथकाने पकडल्याने, एकच खळबळ उडून रोकड कोणाची? असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: 1 crore 8 lakh cash was seized by the code enforcement team in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.