Wimbledon Tennis : अबब्... ३४ हजार किलो स्ट्रॉबेरी, २९ हजार बॉटल्स शॅम्पेनचा विक्रम !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 17:54 IST2018-07-02T17:52:50+5:302018-07-02T17:54:31+5:30
विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे.

Wimbledon Tennis : अबब्... ३४ हजार किलो स्ट्रॉबेरी, २९ हजार बॉटल्स शॅम्पेनचा विक्रम !!!
स्वदेश घाणेकर : सर्वात जूनी आणि प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सोमवार पासून सुरुवात होत आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ज्याच्या नावावर सर्वाधिक ८ विम्बल्डन जेतेपद आहेत तो आपल्या एकूण ग्रॅंड स्लॅम जेतेपदांचा आकडा २१ वर नेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याच्या मार्गात अंतिम फेरीत राफेल नदालचे आव्हान उभे ठाकणार आहे.. त्यामुळे २००८ नंतर ड्रीम फायनल्सचा आस्वाद पुन्हा लुटण्याची संधी आहे. सेरेना विल्यम्सही नव्या इनींगची दणक्यात सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे.. त्यामुळे या एतिहासिक स्पर्धेत पुन्हा एकदा अनेक विक्रम नोंदवले जातील..
मैदानावरील विक्रमांपलिकडे या स्पर्धेला अन्य विक्रमही खुणावत आहेत. विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे. त्या परंपरेनेही अनेक विक्रम नोंदवले आणि प्रत्येक स्पर्धेगणित विक्रमांची ही आकडेवारी अधिक वाढतेही गेली. २०१८ च्या या स्पर्धेसमोर ३४ हजार किलो स्ट्रॉबेरी आणि २९ हजार वाईन बॉटल्स विकण्याचे आव्हान आहे. हा अनोखा विक्रम अबाधित राहतो की नवीन आकडेवारीचा शिखर उभा राहतो याची उत्सुकता लागली आहे.
२०१७ च्या स्पर्धेतील असे कोणते विक्रम यंदा मोडले जाऊ शकतात यावर जरा नजर टाकूया...
४,७३,३७२ प्रेक्षकांनी गतवर्षी उपस्थिती लावली
१४,९७९ भाग्यवान प्रेक्षकांची सेंट्रल कोर्टवर हजेरी
११,३९३ एका सामन्यातील सरासरी प्रेक्षक क्षमता
२,००० अधिक कर्मचारी प्रेक्षकांच्या सेवेसाठी
२९,००० बॉटल्स शॅम्पेन
३४,००० किलो स्ट्रॉबेरी
३,२०,००० ग्लास पिम्मस् ( मद्याचा प्रकार)
३,३०,००० कप चहा व कॉफी
२,३०,००० पाण्याच्या बॉटल्स
१,१०,०० बिअर पिंट्स
८६,००० आइसक्रीम
७६,००० सॅण्डविच
३०,००० पिझ्झा