Wimbledon Tennis 2018 : सुपर मॉम सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 21:35 IST2018-07-09T21:34:46+5:302018-07-09T21:35:40+5:30

tसेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 

Wimbledon Tennis 2018: Super mom Serena in the quarterfinals | Wimbledon Tennis 2018 : सुपर मॉम सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

Wimbledon Tennis 2018 : सुपर मॉम सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन - सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 
आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरलेल्या सेरेनाने तासाभरात रोडीनाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत सेरेनाने एकही सेट गमावलेला नाही. पुढील फेरीत तिला बिगरमानांकित कॅमिला जॉर्जीचा सामना करावा लागेल. 



महिलांमध्ये अनपेक्षित निकालांची मालिका सोमवारीही कायम राहिली. झेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकीत कॅरोलिना प्लिस्कोवा हिला नेदरलँड्सच्या किर्की बर्टन्सकडून ३-६, ६-७(१-७) असा पराभव पत्करावा लागला होता. याआधी बर्टन्सने दिग्गज खेळाडू व्हिनस विलियम्सला पराभवाचा धक्का दिला होता आणि आता प्लिस्कोवाला पराभूत करत ती स्पर्धेत जायंट किलर ठरली आहे. 

Web Title: Wimbledon Tennis 2018: Super mom Serena in the quarterfinals