शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

विम्बल्डन; नोव्हाक जोकोविचची घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:16 AM

सर्बियाचा माजी विजेता नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारताना ब्रिटनच्या काइल एडमंड याला चार सेटमध्ये नमविले. जपानच्या केई निशिकोरी यानेही विजयी कूच करताना चौथ्या फेरीत धडक मारली.

लंडन : सर्बियाचा माजी विजेता नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारताना ब्रिटनच्या काइल एडमंड याला चार सेटमध्ये नमविले. जपानच्या केई निशिकोरी यानेही विजयी कूच करताना चौथ्या फेरीत धडक मारली. त्याचवेळी, जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले आहे. महिलांमध्ये जर्मनीच्या अँजेलिका कर्बेरने विजयी धडाका कायम राखत चौथी फेरी गाठली आहे.२०१६ साली फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने अपेक्षित खेळ केला. त्याने २ तास ५४ मिनिटांच्या रोमांचक लढतीत स्थानिक खेळाडू एडमंडचे कडवे आव्हान ४-६, ६-३, ६-२, ६-४ असे परतावले. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर जोकोविचने आक्रमक खेळ करताना एडमंडला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. जपानच्या निशिकोरी याने अनपेक्षित निकालाची नोंद करताना आॅस्टेÑलियाच्या निक किर्गियोसचे आव्हान ६-१, ७-६(७-३), ६-४ असे संपुष्टात आणले. निशिकोरीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना बलाढ्य किर्गियोसला अखेरपर्यंत दबावाखाली ठेवण्यात यश मिळवले.जर्मनीच्या युवा झ्वेरेवचे आव्हान मात्र अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आले. लात्वियाच्या अर्नेस्ट गल्बिस याने झ्वेरेवला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. ३ तास २० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात झ्वेरेवचा ६-७(२-७), ६-४, ७-५, ३-६, ०-६ असा पराभव झाला. सामना २-२ असा बरोबरीत आल्यानंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये झ्वेरेवला एकही गेम जिंकण्यात यश आले नाही.महिलांमध्ये जर्मनीच्या कर्बेरने चौथी फेरी गाठली. २०१६ साली विम्बल्डनची उपविजेती ठरलेल्या कर्बेरने जपानच्या नाओमी ओसाका हिचा सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-४ असा धुव्वा उडवला. कर्बेरने जबरदस्त नियंत्रण राखताना केवळ १ तास ३ मिनिटांमध्ये बाजी मारली. (वृत्तसंस्था)भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टातएन. श्रीराम बालाजी - विष्णू वर्धन या भारतीय जोडीचे आव्हान दुसºया फेरीत संपुष्टात आले. भारतीय जोडीला बेन मॅकलॅशन (जपान) - जॅन लेनार्ड स्ट्रफ (जर्मनी) या १४व्या मानांकीत जोडीविरुद्ध ६-७(२-७), ७-६(७-३), ६-७(३-७), ३-६ असा पराभव पत्करावा लागला. २ तास ४० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतीय जोडीने कडवा प्रतिकार केला. परंतु, अखेरच्या सेटमध्ये झालेल्या चुकांमुळे त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.

टॅग्स :TennisटेनिसSportsक्रीडा