Wimbledon 2018 : टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर विम्बल्डनच्या कोर्टवर क्रिकेट खेळतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:31 IST2018-07-10T15:57:08+5:302018-07-10T16:31:02+5:30
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला.

Wimbledon 2018 : टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर विम्बल्डनच्या कोर्टवर क्रिकेट खेळतो तेव्हा...
विम्बल्डन - स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि फेडरर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे मातब्बर खेळाडू जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा आपापल्या खेळासंबंधित देवाणघेवाण नक्कीच करत असतील. त्यांना एकमेकांच्या खेळातील बारकावे माहीत झाले असतीलच. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला. त्याची ती अनपेक्षित खेळी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाच, पण फेडररचे अष्टपैलू रुप पाहून ते सुखावले.
फेडररने सोमवारी विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरीनोचा सरळ सेटमध्ये 6-0, 7-5, 6-4 असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटमधील तिसऱ्या गेममध्ये फेडररची बॅटींग पाहायला मिळाली. मॅनेरीनोच्या सर्व्हीसवर पंचानी फाऊल असा निर्णय दिला. मॅनेरीनोने सर्व्हिस केल्यानंतर चेंडू फेडररच्या क्षेत्रात पडला आणि त्याने अगदी सहज डावखुऱ्या फलंदाजाप्रमाणे चेंडू रोखला.
Ratings for @rogerfederer's forward defence, @ICC?#Wimbledonpic.twitter.com/VVAt2wHPa4
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2018
क्रिकेटपटू नेटप्रॅक्टीस करताना ज्या प्रकारे डिफेन्सिव्ह खेळाचे धडे गिरवतात तशाच पद्धतीने फेडररने तो चेंडू अडवला. त्याच्या या खेळीनंतर चाहत्यांमधून वेल प्ले... फेडरर असा आवाज आला.