विम्बल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकही सेट न गमावता आगेकूच करण्याचे सत्र कायम राखताना विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फेडररने विम्बल्डन स्पर्धेत सोळापैकी 15वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने सोमवारच्या सामन्यात फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरीनोचा सरळ सेटमध्ये 6-0, 7-5, 6-4 असा पराभव केला. मी पुरेशी विश्रांती घेतली आहे, कारण येणारा आठवडा तंदुरूस्तीची कसोटी पाहणारा आहे, असे फेडररने सांगितले.
Wimbledon 2018 : फेडेक्स सुसाट; उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 19:55 IST
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकही सेट न गमावता आगेकूच करण्याचे सत्र कायम राखताना विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Wimbledon 2018 : फेडेक्स सुसाट; उपांत्यपूर्व फेरीत धडक
ठळक मुद्देजर्मनीच्याच ज्युलीया जॉर्जेसने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.