Tennis Star Maria Sharapova shares cellphone number and invites fans to text her svg | लॉकडाऊनमुळे कंटाळली टेनिस सुंदरी; सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर अन्...

लॉकडाऊनमुळे कंटाळली टेनिस सुंदरी; सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर अन्...

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. अशात काही खेळाडू कुटुंबीयांसोबत रमले आहेत, तर काही व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडियावरूही अनेक खेळाडू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. पण, बराच काळ घरात कोंडून राहिल्यानं काही खेळाडू वैतागलेही आहेत. अशाच एका कंटाळलेल्या टेनिस सुंदरीनं विरंगुळा दूर करण्यासाठी सोशल मीडियावर चक्क स्वतःचा फोन नंबर शेअर केला. त्यानंतर जे झाले ते पाहूया...

टेनिस स्टार मारिया शारापोव्हानं तिच्या ट्विटर हँडलवर तिचा फोन नंबर शेअर केला. त्यानंतर चाहत्यांच्या मॅसेजनं तिचा फोन सतत खणाणतो आहे. तिनं हा नंबर शेअर करताना मला तुमच्याशी बोलायला आवडेल. लॉकडाऊनच्या काळातील  अनुभव माझ्याशी शेअर करा. मी तुमच्याशी नंबर शेअर करत आहे आणि तुम्ही मला प्रश्न मॅसेज करा. मी त्यावर उत्तर देईन, असे आश्वासन दिले. 


शारापोव्हानं नंबर शेअर केल्यानंतर 40 तासात तिच्या व्हिडीओला 22 लाख व्ह्यू मिळाले. शारापोव्हानं नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये दिग्गज खेळाडूची 'Sex Party'; कॉलगर्ल्सना बोलावलं घरी!

Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

हिंदू खेळाडूच्या विनंतीचा राखला मान.... शाहिद आफ्रिदीकडून पाकमधील हिंदूंना मदत

उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी

भारताच्या माजी फलंदाजानं निवडला India-Pakistanचा सर्वोत्तम कसोटी संघ; पाक खेळाडूकडे नेतृत्व 

... म्हणून ऑसी खेळाडू विराटशी पंगा घ्यायला घाबरतात, मायकेल क्लार्कचा गंभीर आरोप

कोरोनामुळे IPL 2020 न होणे ही लाजीरवाणी गोष्ट; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजाची मुक्ताफळं

 

Web Title: Tennis Star Maria Sharapova shares cellphone number and invites fans to text her svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.