Manchester City head coach Pep Guardiola's mother passes away due to Corona Virus complications svg | Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

मँचेस्टर सिटीचे मुख्य प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांच्या आईचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील ( ईपीएल) क्लबनं ही माहिती दिली. डोलोर्स साला कॅरिओ या बार्सिलोना येथील मानरेसा येथे राहतात आणि त्या 82 वर्षांच्या होत्या. मँचेस्टर सिटीनं म्हटलं की,''क्लबकडून पेप यांच्या आईला श्रंद्धांजली वाहिली जात आहे.'' 


स्पेनमधील कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पेप यांनी 8 कोटींची मदत केली होती.   

 दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे एका खेळाडूवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना प्राण गमवावे लागले. वडीलांनंतर या खेळाडूच्या आजीनं शनिवारी कोरोना व्हायरसमुळे अखेरचा श्वास घेतला. अँथोनी यार्डे असे या खेळाडूचे नाव आहे. ब्रिटीश बॉक्सर असलेल्या यार्डेनं शनिवारी आजीचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेली ही कुटुंबातील दुसरी व्यक्ती असल्याचेही त्यानं सांगितलं. गत आठवड्यात यार्डेच्या वडीलांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

28 वर्षीय यार्डेनं लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं लिहिले की,''माझ्या कुटुंबातील दोन सदस्यांना मी गमावले आहे. हा विषाणू घातकी आहे. तरीही लोकं अजूनही बाहेर फिरत आहेत. असं करण्याची गरज नाही. स्वतःच आणि इतरांचं आयुष्य धोक्यात आणू नका. घरीच राहा.'' 

तत्पूर्वी, स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या २१ व्या वर्षी प्राण गमवावे लागले. त्यानंतर पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॉशपटू आझम खान यांचा कोरोना व्हायरसमुळे लंडन येथे मृत्यू झाला. लान्सशायर कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. ते 71 वर्षांचे होते.

Web Title: Manchester City head coach Pep Guardiola's mother passes away due to Corona Virus complications svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.