शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:44 AM

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहताना टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केले, परंतु नेटिझन्सने तिला ट्रोल केले. 

हैदराबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतभर शोक व्यक्त केला जात आहे आणि प्रत्येक जण शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करत आहेत. त्याचवेळी ते दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहताना टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केले, परंतु नेटिझन्सने तिला ट्रोल केले.  सानियाने त्या नेटकऱ्यांना चांगलेच खडसावताना एक मोठी पोस्ट शेअर केली. ती म्हणाली,''सेलेब्रिटींना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोहण्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. त्यांने सेलेब्रिटींना देशाप्रती प्रेम वाटते की नाही, हे सिद्ध होते, असाची त्यांचा समज आहे. पण, सेलेब्रिटींवर टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रासलेले असतात आणि राग व्यक्त करण्यासाठी त्यांना कोण भेटत नाही. त्यामुळे ते सेलेब्रिटींना टारगेट करून द्वेष पसरवतात.''  सानियाने पुढे लिहिले की,'' मी भारतासाठी खेळते. देशाला पदक मिळवून देण्यासाठी मेहनत घेते.  मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. हे जवान आपले खरे नायक आहेत. 14 फेब्रुवारीचा दिवस हा काळा दिवस होता आणि असा दिवस पुन्हा पाहायला मिळणार नाही, अशी आशा करते.''  सानियाचा जन्म हा हैदराबादचा, परंतु तिने 2010 मध्ये पाकिस्तान क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला. त्यानंतर तिला भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादात सतत नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. त्याचवेळी सानियाचे करीअरमध्येही काही चांगले सुरु नव्हते. वाईट फॉर्मातून सानिया जात होती. दुसरीकडे शोएबलाही क्रिकेटमध्ये जास्त धावा करता येत नव्हता.  सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. पण लग्न केल्यावर मात्र दोघांचे आयुष्य पालटून गेले.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला