'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकला लग्नाच्या हटके शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 13:00 IST2020-04-13T12:59:51+5:302020-04-13T13:00:26+5:30

सानिया मिर्झा अन् शोएब मलिकच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण

Sania Mirza's "Expectation vs Reality" Post For Shoaib Malik On 10th Marriage Anniversary svg | 'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकला लग्नाच्या हटके शुभेच्छा

'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकला लग्नाच्या हटके शुभेच्छा

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं रविवारी पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याला लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. तिनं सोशल मीडियावर लग्नातील दोन फोटो पोस्ट केले आणि त्याखाली तिनं अपेक्षा वि. वास्तव (Expectations vs reality) असे लिहीले. तिच्या या पोस्टवरून अनेकांनी तिची फिरकी घेतली. 

सानिया-शोएबचं लग्न कसं झालं?
सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब याच्यासह साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. त्याचवेळी सानियाचे करीअरमध्येही काही चांगले सुरु नव्हते. वाईट फॉर्मातून सानिया जात होती. दुसरीकडे शोएबलाही क्रिकेटमध्ये जास्त धावा करता येत नव्हता. 

सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. पण लग्न केल्यावर मात्र दोघांचे आयुष्य पालटून गेले.  30 ऑक्टोबरला सानिया-शोएबला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले.


अन्य महत्त्वाच्या बातम्या

अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!

लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा

शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न

क्रिकेटला ब्रेक तरीही विराट कोहली टॉप; आयसीसीनं पोस्ट केली मजेशीर आकडेवारी

Web Title: Sania Mirza's "Expectation vs Reality" Post For Shoaib Malik On 10th Marriage Anniversary svg