प्रेग्नेंसीवर मिळालेल्या टिप्सवर भडकली सानिया मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:54 IST2018-10-15T19:53:48+5:302018-10-15T19:54:21+5:30

सानियाला आता प्रेग्नेंसीबद्दलच्या बऱ्याच टिप्स मिळत असून या गोष्टीला ती वैतागली आहे.

Sania Mirza broached on tips from Pregnancy | प्रेग्नेंसीवर मिळालेल्या टिप्सवर भडकली सानिया मिर्झा

प्रेग्नेंसीवर मिळालेल्या टिप्सवर भडकली सानिया मिर्झा

ठळक मुद्देआपल्या ट्विटवर हँडलवर सानियाने काही पोस्ट केल्या आहेत. या पोस्टनुसार सानिया या टिप्स देणाऱ्या लोकांवर चांगलीच भडकलेली दिसत आहे. 

नवी दिल्ली : भारताचीटेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा ही सध्या गर्भवती आहे. तिने काही दिवसांपूर्वी आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर सानियाला आता प्रेग्नेंसीबद्दलच्या बऱ्याच टिप्स मिळत असून या गोष्टीला ती वैतागली आहे. आपल्या ट्विटवर हँडलवर सानियाने काही पोस्ट केल्या आहेत. या पोस्टनुसार सानिया या टिप्स देणाऱ्या लोकांवर चांगलीच भडकलेली दिसत आहे. 


आपल्या एका पोस्टमध्ये सानिया म्हणाली की, " मुलगा हवी कि मुलगी, हा प्रश्न माझ्यासाठी मोठा नाही. कारण माझ्यासाठी दोन्ही समान आहेत. पण काही जणांना या गोष्टीचा फरक पडतो. ज्या लोकांना फरक पडतो त्यांनी त्यांचे विचार आपल्याकडेच ठेवावेत. "


टिप्स देणाऱ्या लोकांना उद्देशून सानिया म्हणाली की, " तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्हा करा, पण तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करेनच असे नाही. प्रत्येकाने स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. सध्याच्या घडीला माझ्या बाळाची तब्येत माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. "

Web Title: Sania Mirza broached on tips from Pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.