Roger Federer to face Rafael Nadal in French Open semi-finals, not easy for federer | नदालशी सामना म्हणजे पराभव; फ्रेंच ओपनमध्ये फेडररसाठी समीकरण 

नदालशी सामना म्हणजे पराभव; फ्रेंच ओपनमध्ये फेडररसाठी समीकरण 

- ललित झांबरे
टेनिसच्या इतिहासातील सर्वात सफल खेळाडू, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल, हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. फ्रेंच ओपनच्या   अंतिम फेरीतील स्थानासाठी त्यांच्यात लढत होणार आहे आणि शुक्रवारी होणाऱ्या  या लढतीकडे जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष लागून आहे. 

नदाल व फेडरर यांचे सामने टेनिस जगताला नवे नसून 39 व्यांदा ते समोरासमोर येत आहेत. यापैकी 23 विजय नदालचे तर 15 विजय फेडररचे आहेत. मात्र क्ले कोर्टवर नदालच्या बाजूने 13-2 अशी अतिशय एकतर्फी  ही आकडेवारी आहे आणि फ्रेंच ओपनमध्ये तर नदालचे फेडररवर 5-0 असे पूर्णपणे वर्चस्व आहे. या पाचपैकी फेडररचे चार पराभव अंतिम सामन्यांतील (2006, 07, 08 आणि 2011) आहेत. म्हणजे नदालने तब्बल चार वेळा फेडररला फ्रेंच ओपनच्या विजेतेपदापासून वंचित ठेवले आहे. यापैकी 2008 च्या अंतिम सामन्यातील पराभव हा फेडररच्या कारकिर्दीतील सर्वात दारुण पराभव होता. 

फेडररच्या या पाच पराभवांचा तपशील असा..
2011- अंतिम फेरी- नदाल विजयी 7-5, 7-6 (3), 5-7, 6-1
2008- अंतिम फेरी- नदाल विजयी 6-1, 6-3, 6-0
2007- अंतिम फेरी- नदाल विजयी  6-3, 4-6, 6-3, 6-4
2006- अंतिम फेरी- नदाल विजयी 1-6, 6-1, 6-4, 7-6 (4)
2005- उपांत्य फेरी- नदाल विजयी 6-3, 4-6, 6-4, 6-3
 

Web Title: Roger Federer to face Rafael Nadal in French Open semi-finals, not easy for federer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.