Postpone fight, or change location | लढत स्थगित करा, किंवा स्थळ बदला, भारत- पाक सामन्याबाबत टेनिस संघटनेने आयटीएफला ठणकावले
लढत स्थगित करा, किंवा स्थळ बदला, भारत- पाक सामन्याबाबत टेनिस संघटनेने आयटीएफला ठणकावले

नवी दिल्ली: अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) विश्व टेनिस महासंघाला (आयटीएफ) पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी हलवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा किंवा ही लढत रद्द करावी, असे बुधवारी ठणकावून सांगितले.
आधीपेक्षा अधिक ताठर भूमिका घेणाऱ्या एआयटीएने १४-१५ सप्टेंबर रोजी होणाºया आशिया- ओशियाना डेव्हिस चषक टेनिस सामन्यासाठी आपण स्वत:हून स्थान बदलण्याचा आग्रह करणार नाही. आयटीएफने स्वत:हूनच पुढाकार घ्यावा आणि परिस्थितीचा आढावा घेत लढतीचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. भारताला काही विनंती करायची नाही, लढत आयोजित करण्याची अथवा रद्द करण्याची जबाबदारी आयटीएफचीच आहे, असे एआयटीएला वाटते.
आयटीएफचे कार्यकारी संचालक जस्टिन अल्बर्ट यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात एआयटीए म्हणते,‘ सद्यस्थिती पाहता आयटीएफच्या संचालक मंडळाने दोन पर्याय निवडायला हवे. एकतर डेव्हिस चषक लढत नोव्हेंबर/डिसेंबरपर्यंत स्थगित करावी, किंवा ती त्रयस्थ ठिकाणी आयोजित करावी. याआधी अल्बर्ट यांनी इस्लामाबादच्या सुरक्षा व्यवस्थेवर आयटीएफ समाधानी असल्याचे वक्तव्य केले होते.
भारत-पाक लढत त्रयस्थ ठिकाणी व्हावी, अशी विनंती भारतीय संघातील खेळाडूंनी केली पण भारतीय टेनिस संघटना मात्र सुरक्षा व्यवस्थेची हमी मागत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘आम्ही भारतीय टेनिस संघटनेकडे त्रयस्थ ठिकाणी सामन्याची विनंती केली आहे’ असे भारताचा कर्णधार महेश भूपतीने सांगितले. संघटना हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळत आहे, हे पाहून आश्चर्य वाटले, असे अन्य खेळाडूने म्हटले आहे.


त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी डेव्हिस चषक सामना खेळवण्यात यावा, अशी वारंवार मागणी भारतीय टेनिस संघटनेकडून केली जात असल्याचे चर्चेत आहे.

परंतु संघटनेचे सरचिटणीस हिरण्यमय चॅटर्जी यांनी फक्त कडेकोट सुरक्षेची हमी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे मागितल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खेळाडू आणि संघ व्यवस्थापन निराश झाल्याने त्यांनी संघटनेशी संपर्क साधला आहे.


संघटना हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळत आहे, हे पाहून आश्चर्य वाटले, असे अन्य खेळाडूने म्हटले आहे.
सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील ताज्या आढाव्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने हिरवा कंदील दिल्यास १४ आणि १५ सप्टेंबरला होणाºया सामन्यासाठी व्हिसा प्रक्रिया करावी लागणार आहे, असे भारतीय टेनिस संघटनेने सांगितले.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध पुन्हा बिघडले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने डेव्हिस चषक लढतीबाबत ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे,’असे टेनिस संघटनेतील एका गटाचे म्हणणे आहे.
ही लढत द्विपक्षीय मालिका नाही. डेव्हिस चषक लढतीचे आयोजन जागतिक संघटना करीत असते. त्यामुळे माघार घेणे योग्य ठरणार नाही,’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.आॅलिम्पिक क्रीडा प्रकारांना सरकारचा हस्तक्षेप मान्य नसतो. परंतु टेनिसपटू हे भारताचे नागरिक नाहीत का? या खेळाडूंना न थांबवून सरकार त्यांच्या जीवाची जोखीम का पत्करत आहे’ असा प्रश्न एका पदाधिकाºयाने विचारला.

चॅटर्जींनी मांडली भारताची बाजू

हिरण्यमय चॅटर्जी यांनी आयटीएफपुढे भारताची बाजी मांडली. ते म्हणाले,‘सद्यस्थितीत इस्लामाबादला भारतीय उच्चायुक्त नाही. उभय देशांदरम्यान रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय बससेवा देखील तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली. पाकिस्तानात फार तणाव असून भारतीय विमानांसाठी हवाईमार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. आमच्या चिंतेने आयटीएफ समाधानी होत असेल तर सर्व काही सुरळीत होऊ शकते.’आयटीएफचे समाधान न झाल्यास आम्ही संचालक मंडळापुढे स्वत:ची बाजू मांडण्याची विनंती करणार आहोत.


Web Title: Postpone fight, or change location
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.