शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सहा वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 5:56 PM

सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरणाऱ्या नोवाक जोकोविच याचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

मेलबर्न : सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरणाऱ्या नोवाक जोकोविच याचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुखापतीतून सावरणाऱ्या नोव्हाक जोकोविचला चौथ्या फेरीत चुंग हेयोनकडून पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्नच्या तापमानात वाढ झाल्याने खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. चुंग हेयोनने जोकोविचला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. दक्षिण कोरियाच्या चुंग हेयोननं  7-6, 7-5, 7-6  अशा फरकानं सर्बियाच्या नोवाक जोकोविचवर विजय मिळवला. या पराभवानंतर नोवाक जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 

पुढील फेरीत दक्षिण कोरियाच्या चुंग हेयोनचा सामना टैनिस सँडग्रेन याच्यासोबत होणार आहे. टैनिसनं नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत पाचव्या स्थानावरील डोमिनिकचा पराभव केला होता. जोकोविचचा पराभव केल्यामुळं चुंग हेयोनचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल. त्यामुळं दोघातील सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्याता आहे. 

पराभवाच्या भीतीपोटी जोकोविचने घेतला होता ध्यानाचा आधार -स्पर्धेतील पराभवाची भीती आणि तणावापासून दूर राहण्यासाठी सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ध्यानाचा आधार घेतला होता. तरीही तो आपला पराभव टाळू शकला नाही.  मेडिटेशनमुळे त्याला बरीच मदत होत असल्याचेही त्याने सांगितले होतं. 

काय म्हणाला होता जोकोविच - ‘स्पर्धेतील चौथ्या फेरीतील जागा पक्की करण्याचा दबाव आहे. यासाठी मी रोज ध्यान करतो. यातून मला काय मिळते हे मी सांगू इच्छित नाही; परंतु यात मी मग्न होऊन जातो. चिंता आणि तणावापासून मी मुक्त होण्याचा हा उत्तम मार्ग आहे. 

पेस-राजा पराभूत-भारताची अनुभवी जोडी लिएंडर पेस आणि पूरव राजा यांना पुरुष दुहेरीतील उपउपांत्यपूर्व सामन्यात युआन सेबेस्टियन कबाल आणि रॉबर्ट फराह या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. बिनमानांकित भारतीय जोडीला १ तास ९ मिनिटांच्या सामन्यात ११ व्या मानांकित जोडीने ६-१, ६-२ ने सरळ सेटमध्ये पराभूत केले. अमेरिकन ओपन २०१७मध्ये ही जोडी दुस-या फेरीतून बाहेर पडली होती. गेल्या एक वर्ष आणि अधिक वेळेपासून लिएंडर पेसला स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही.

वोज्नियाकी-नवारो सामना रंगणार-महिला गटात कॅरोलिन वोज्नियाकी हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना स्पेनची अनुभवी खेळाडू कार्ला सुआरेज नवारो हिच्याविरुद्ध होईल. ढगाळ वातावरण असतानाही वोज्नियाकीने शानदार प्रदर्शन केले आणि पहिल्या ग्रॅण्डस्लॅम विजयाची दावेदारी अधिक मजबूत केली. तिने मॅगडालेना रिबरिकोव्हाचा ६-३, ६-० ने पराभव केला. दुसरीकडे, स्पेनच्या नवारोने एस्टोनियाविरुद्ध ४-६, ६-४, ८-६ ने विजय नोंदवला. नवारो ही आपल्या विजयाचे श्रेय आक्रमकतेला देते.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन