निशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 03:05 IST2018-10-07T03:04:55+5:302018-10-07T03:05:12+5:30

दोन वेळा चॅम्पियन असलेल्या केई निशिकोरी याने रिचर्ड गास्केटला पराभूत करत जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Nishikori in the final round; Powerful contenders of the winner | निशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार

निशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार

टोकियो : दोन वेळा चॅम्पियन असलेल्या केई निशिकोरी याने रिचर्ड गास्केटला पराभूत करत जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिसऱ्या मानांकित निशिकोरीने ८९ मिनिटे चाललेल्या सामन्यात फ्रान्सच्या गास्केटला सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याने गास्केटवर ७-६,६-१ अशी मात केली. निशिकोरी या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
निशिकोरीने दोन वर्षापुर्वी मेम्फिस येथे ११ वे जेतेपद पटकावले होते. निशिकोरीला अंतिम सामन्यात दानिल मदवेदेव याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. दानिलने कॅनडाच्या डेनिस शापोवालोवला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.

Web Title: Nishikori in the final round; Powerful contenders of the winner

टॅग्स :Tennisटेनिस