महेश पाटील आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:54 IST2017-10-24T16:53:46+5:302017-10-24T16:54:10+5:30
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतीवर्षी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेश बाबुराव पाटील

महेश पाटील आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित
डोंबिवली - महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतीवर्षी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेश बाबुराव पाटील यांना सोमवारी प्रदान करण्यात आला.
द प्राईड आॅफ महाराष्ट्र च्या१४ वा राज्यस्तरीय गौरव समारंभ, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न झाला. त्यावेळी पाटील यांना सत्कार करण्यात आला. पाटील यांना पितृशोक असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे सहकारी सुजित नलावडे यांनी तो सत्कार स्विकारला. लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातात कार्यरत असलेल्या अन्य मान्यवरांनासुध्दा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, विनामूल्य शिकवणी वर्ग, महिलांसाठी व्यावसायिक उपक्रम तसेच वनवासी बांधवांना अन्न-धान्य, वस्त्र वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे विविध उपक्रम अशा सामाजिक बांधिलकी जपणा-या असंख्य उद्दीष्ठांमध्ये पाटील यांचा सातत्याने सहभाग असतो. त्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितल्याचे नलावडे म्हणाले. पाटील यांनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा पुरस्कारांमुळे स्फूर्ती, प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले.