शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

फेडरेशन चषकातील कामगिरी उत्साहवर्धक - सानिया मिर्झा; युवा खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:25 PM

अंकिता रैनाच्या बळावर फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत भारताने फार चांगली कामगिरी केली ही कामगिरी उत्साहवर्धक होती असे नमूद करीत टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने भारतीय संघ मात्र पुढील फेरी गाठण्याचा हकदार होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : अंकिता रैनाच्या बळावर फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत भारताने फार चांगली कामगिरी केली ही कामगिरी उत्साहवर्धक होती असे नमूद करीत टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने भारतीय संघ मात्र पुढील फेरी गाठण्याचा हकदार होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मागच्या आठवड्यात झालेल्या रेलिगेशन प्ले आॅफ लढतीत भारतीय संघाने चायनीज तायपेईवर २-० ने विजय नोंदवित आशिया- ओसियाना ग्रुपमध्ये स्थान कायम राखले. त्याआधी,भारताचा चीन आणि कझाखस्तानकडून मात्र पराभव झाला. यावर सानिया म्हणाली,‘ युवा खेळाडूंच्या कौशल्यात भर पडल्यानंतरही आम्ही नेहमी रिकाम्या हाताने परतत आहोत. अंकिताने मात्र रँकिंगमध्ये पहिल्या शंभर जणात असलेल्या खेळाडूंवर दोनदा विजय नोंदविला हे फारच प्रभावित करणारे दृष्य होते. संघाने सामने गमावले तरी त्यातून सकारात्मक चित्र उभे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)सानियापेक्षा दमदार खेळाडू घडावा...भविष्यातील सानिया बनण्याची क्षमता कुठल्या खेळाडूमध्ये आहे, असा सवाल करताच सानिया म्हणाली,‘युवा खेळाडूंचा विचार करायचा झाल्यास त्यांच्या कामगिरीला आधार मानू नये.’जखमांमुळे कोर्टपासून दूर असलेल्या सानियाची दुहेरी रँकिंगमध्ये १४ स्थानांनी घसरण झाली.याविषयी ती म्हणाली,‘भविष्यातील सानिया कोण, हा प्रश्न अनेक वर्षांपासून मला विचारला जात आहे. मी नेहमी सांगत आले की पुढची सानिया का? सानियापेक्षा आणखी सरस खेळाडू शोधण्याचा प्रयत्न का होऊ नये? सानियापेक्षा दमदार खेळाडू बनण्यासाठी युवा खेळाडूंनी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवायला हवी.’सानिया मिर्झाने यावेळी युवा खेळाडू अंकिता रैनाच्या कामगिरीचे कौतुक केले. सानिया म्हणाली, ‘अंकिताचे प्रदर्शन शानदार राहिले. तिने दोन वेळा जागतिक क्रमवारीत अव्वल १०० मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला.’ त्याचप्रमाणे, ‘या कामगिरीनंतरही भारतीय संघ पराभूत झाला असला तरी, यातून सकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. युवा खेळाडूंनी आता अधिक मेहनत घ्यावी.’सेरेना सर्वात महान खेळाडूसेरेना विलियम्सचा अपवाद वगळता महिला टेनिसवर कुठल्याही एका खेळाडूचे वर्चस्व राहिलेले नाही. तिच्या व्यतिरिक्तकुणीही जेतेपदाचा बरोबरीचादावेदार असतो. सेरेना जेव्हा-जेव्हा पराभूत होते तेव्हा जेतेपदाचेअनेक दावेदार असतात. सेरेना टेनिसमधील सर्वात महान खेळाडूआहे. महिला टेनिसमध्ये फारचचढाओढ आहे. त्यामुळेच अधिकरँकिंग असलेली खेळाडूही चौथ्याकिंवा पाचव्या स्थानावरील खेळाडूला पराभूत करताना दिसते.’- सानिया मिर्झा

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झा