शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 06:08 IST

बोपन्नासाठी २०२४ चे सत्र चांगले ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या एबडेनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते.

- रोहित नाईकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘दोन वर्ष मॅथ्यू एबडेनसोबत केलेला खेळ संस्मरणीय ठरला. त्याच्यासोबत यादरम्यान अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. पण, आता त्याला आगामी सत्रात वेगळ्या साथीदारासोबत खेळायचे आहे. त्यामुळे मी निकोलस बरीएंटोससोबत जोडी केली आहे,’ असे भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

बोपन्नासाठी २०२४ चे सत्र चांगले ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या एबडेनसोबत ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. मात्र, आता तो पुढील वर्षी ॲडलेड ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत कोलंबियाच्या बरिएंटोससोबत खेळेल. याआधी, बोपन्ना पुन्हा एकदा आपला जुना सहकारी क्रोएशियाचा इवान डोडिग याच्यासह खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचे सांगत बोपन्नाने या चर्चांनाही पूर्णविराम दिला. मुंबई मॅरेथॉनच्या टी-शर्ट व शूजचे अनावरण करताना बोपन्नाने संवाद साधला. यावेळी स्टार स्क्वॉशपटू सौरव घोषाल याचीही उपस्थिती होती.

तो म्हणाला की, ‘मी डिडिगसोबत जोडी बनवणार असल्याचे वृत्त खोटे आहे. एबडेनला नव्या आता नव्या खेळाडूसह खेळायचे असल्याने माझ्याकडे नवा जोडीदार शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. एबडेनसोबतचा प्रवास शानदार ठरला. मी आता निकोलससोबत खेळणार असून आगामी ॲडलेड आणि मेलबर्न येथील स्पर्धेत  त्याच्यासोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.’ बोपन्ना मार्च महिन्यात वयाची ४४ वर्ष पूर्ण करेल. ‘खेळावरील असलेल्या प्रेमामुळे मला अजूनही प्रेरणा मिळते,’ असे त्याने म्हटले. बोपन्ना म्हणाला की, ‘मी अजूनही खेळाचा आनंद घेतो. माझ्यामुळे युवा खेळाडू प्रेरित होतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २०२४ वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम ठरले. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी जेतेपद, जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान यामुळे देशाचाही सन्मान झाला. याचा मला अभिमान आहे.’

माझ्यासोबत माझी अप्रतिम टीम आहे. त्याचप्रमाणे कुटुंबियांकडून मिळणारा पाठिंबा मोलाचा आहे. माझी मुलगी मला खेळताना बघेल, याची मी आशा केली नव्हती. पण, आज ती पाच वर्षांची असून टेनिस कोर्टवर ती मला खेळताना पाहते आणि हे माझ्यासाठी संस्मरणीय ठरत आहे. माझे कुटुंब मला ग्रँडस्लॅम खेळताना पाहतेय याहून दुसरी प्रेरणादायी गोष्ट नाही.    - रोहन बोपन्ना

टॅग्स :Tennisटेनिस