शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:13 IST

French Open 2025: अमेरिकेच्या द्वितीय मानांकित कोको गाॅफने शानदार कामगिरी करताना शनिवारी अंतिम लढतीत बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंका हिच्यावर रोमांचक विजय मिळवताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

पॅरिस - अमेरिकेच्या द्वितीय मानांकित कोको गाॅफने शानदार कामगिरी करताना शनिवारी अंतिम लढतीत बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंका हिच्यावर रोमांचक विजय मिळवताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. गाॅफचे हे एकेरीतील पहिलेच फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. २०२४मध्ये तिने फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याआधी गाॅफने २०२३मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत एका सेटच्या पिछाडीवरून सबालेंकालाच पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

कोको गाॅफने दोन तास ३८ मिनिटे रंगलेल्या रोमांचक लढतीत सबालेंकावर ६-७ (५-७), ६-२, ६-४ असा शानदार विजय मिळवला. टायब्रेकरमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर गाॅफने दमदार पुनरागमन करताना संस्मरणीय विजय साकारला. २०१३ नंतर पहिल्यांदाच पॅरिसमध्ये अग्रमानांकित आणि द्वितीय मानांकित यांच्यात अंतिम सामना रंगला. २०१३मध्ये सेरेना विलियम्सने मारिया शारापोव्हाला पराभूत केले होते. गेल्या ३० वर्षांत हा पहिल्या दोन खेळाडूंमधील केवळ दुसरा सामना ठरला. गॉफच्या दुसऱ्या मॅच पॉइंटवर सबालेंकाने बॅकहँड वाइड पाठवल्यानंतर २१ वर्षीय गाॅफ पाठीवर पडून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत तिने जल्लोष केला. सबालेंकाने गाॅफचे अभिनंदन केल्यानंतर तिने फिल्म डायरेक्टर स्पाइक ली यांची गळाभेट घेत सहकाऱ्यांसह आनंद साजरा केला. सबालेंकाने निर्णायक सेटमध्ये आक्रमक सुरुवात केली. पहिला सर्व्हिस गेम राखण्यासाठी तिने जोखीम घेतली. तिसऱ्या सेटमध्ये गॉफने खेळ उंचावताना उत्कृष्ट रॅली जिंकली.

तिसऱ्या सेटमध्ये गाॅफने राखले सातत्यगॉफने बेसलाइनपासून सातत्य राखले आणि ब्रेक पॉइंट मिळवला, जो तिने सबालेंकाच्या दुहेरी चुकीवर रूपांतरित केला. ज्यामुळे गाॅफला २-१ अशी आघाडी मिळाली. सबालेंकाने निराशा व्यक्त केली पण त्यानंतर तिने सामना ३-३ असा बरोबरीत आणला. गॉफने दोनदा सबालेंकाची सर्व्हिस ब्रेक करत वर्चस्व गाजविले.

चाहत्यांच्या प्रेमामुळेच जिंकले : गाॅफ गाॅफ म्हणाली की, आज या गर्दीने मला खरोखर मदत केली. तुम्ही मला प्रोत्साहन देत होता आणि त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला. त्यामुळेच मी आज येथे जिंकू शकले.

 

टॅग्स :Tennisटेनिस