Breaking : Serbian tennis ace Novak Djokovic tests positive for COVID-19 | Breaking : 'अव्वल नंबरी' नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह, 'तो' इव्हेन्ट महागात पडला!

Breaking : 'अव्वल नंबरी' नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह, 'तो' इव्हेन्ट महागात पडला!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सोमवारी टेनिसपटू बोरॅन कॉरीक आणि ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. 

क्रोएशियाचा बोर्ना कॉरीक आणि बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचनं आयोजित केलेल्या प्रदर्शनीय सामन्यात दोघंही सहभागी झाले होते. जोकोव्हिचनं मागील आठवड्यात  Adria Tour exhibition सामना आयोजित केला होता. त्यानंतर दिमित्रोव्ह आणि कॉरिक हे अनुक्रमे रविवारी व सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 

या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाची चाचणी करण्यात आली. त्यात जोकोव्हिच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.''ही स्पर्धा आयोजित करताना आम्ही सर्व काळजी घेतली होती. सर्बियन आणि क्रोएशिया सरकारनं दिलेल्या नियमांचं आम्ही पालन केले. पण, तरीही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आता सर्वांची चाचणी करण्यात आली,'' असे टेनिसपटू  जॉर्ड जोकोव्हिच यानं दिली.

दरम्यान, जोकोव्हिच आणि त्याची पत्नी जेलेना यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. ''जेलेना आणि मला कोरोना झाला आहे, परंतु आमच्या मुलांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. मागील महिन्यात आम्ही स्पर्धा आयोजित केली, त्यामागचा हेतू साफ होता. या कठीण काळात एकतेचा संदेश आम्हाला त्यातून द्यायचा होता. यातून मिळालेला निधी गरजू टेनिसपटूंसाठी वापरण्यात येणार आहे. पण, हे काही भलतंच होऊन बसलं.''

 

Read in English

Web Title: Breaking : Serbian tennis ace Novak Djokovic tests positive for COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.