शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

#BestOf2017 : युवा खेळाडूंनी दाखवली आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 2:49 AM

सरत्या वर्षामध्ये भारतीय टेनिसपटूंनी लक्षवेधी कामगिरी करत आपली छाप पाडली. भारताच्या युवा खेळाड़ूंनी काही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का देत टेनिसविश्वात खळबळ माजवली.

नवी दिल्ली : सरत्या वर्षामध्ये भारतीय टेनिसपटूंनी लक्षवेधी कामगिरी करत आपली छाप पाडली. भारताच्या युवा खेळाड़ूंनी काही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का देत टेनिसविश्वात खळबळ माजवली. त्याचवेळी दुसरीकडे अनुभवी रोहन बोपन्ना याने ग्रॅण्ड स्लॅम आपल्या नावे केला. परंतु, महिला गटात स्टार खेळाडू सानिया मिर्झाची मात्र अव्वल स्थानावरून घसरण सुरू झाली.त्यामुळेच भारतीय टेनिससाठी हे वर्ष काहीसे संंमिश्र राहिले, असेच म्हणावे लागेल. कारण यंदा कोणीही मोठे शिखर सर केलेले नाही किंवा कोणीही एकदम रसातळाला पोहोचलेले नाही. युवा खेळाडूंनी आपल्या जोरावर आशा कायम ठेवल्या आहेत.युकी भांबरी, रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी गेल्या वर्षात यश मिळवले. त्यांनी आपल्या क्षमतेचा योग्य वापर केला, आणि सलग चांगले खेळ केले. मात्र क्रीडा प्रशासकांचे समर्थन आणि कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली नाही.पूर्ण सत्रात भारतात फक्त दोन चॅलेंजर स्पर्धा पुणे आणि बंगळुरू येथे खेळवण्यात आल्या. युकी याने पुण्यात चॅलेंजर स्पर्धा जिंकली तर नागर याने बंगळुरूत विजय मिळवला. यामुळे दोन्ही खेळाडूंच्या रँकिंगमध्ये खूपच सुधारणा झाली.भारतातील पुरुषांच्या फक्त ९ फ्युचर्स आयटीएफ टुर्नामेंट आणि महिलांच्या सहा टुर्नामेंट खेळवण्यात आल्या. खेळाडूंच्या गरजांबाबत ‘एआयटीए’ गप्प राहिली. पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी क्रीडा मंत्रालयात काही बैठका घेण्याव्यतिरिक्त फारसे काही केले नाही. मात्र मंत्रालयाने पैसा गोळा करणे ही एआयटीएची जबाबदारी असल्याचे सांगत हात झटकले.रोहन बोपन्ना याने कॅनडाच्या गॅब्रिएल डोबरावस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. त्यासोबतच तो ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू बनला. दुहेरीच्या रँकिंगमध्ये तो सलग अव्वल २० मध्ये राहिला. त्याने तीन एटीपी विजेतेपद पटकावले. त्यात मॉँटो कार्लो मास्टर्सचादेखील समावेश होता. दिवीज शरण याने पुरव राजासोबतची जोडी तुटल्यावरही एटीपी युरोपियन ओपन आणि चॅलेंजर सर्किटमध्ये दोन विजेतेपद पटकावले.तरीही युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन केले. युकी भांबरी याने अमेरिकेत एटीपी सिटी ओपनमध्ये जगातील २२ व्या क्रमांकाच्या गोएल मेफिल्स याला पराभूत करून जागतिक टेनिस लक्ष वेधले. दुसरीकडे, रामकुमार याने आठव्या क्रमाकांच्या डॉमनिक थिएम याला तुर्कीतील अंताल्या ओपनमध्ये पराभूत करत खळबळ माजवली.गेल्या दोन वर्षांत शानदार खेळ करणाºया सानिया मिर्झा हिने यंदा अव्वल रँकिंग गमावले. हिंगीसनंतर सानियाला एकही चांगला जोडीदार मिळालेला नाही. शुआई पेंगसोबत ती अमेरिकन ओपन उपांत्य फेरीत पोहोचली होती.लिएंडर पेस याने या वर्षी सलग दोन चॅलेंजर विजेतेपद पटकावले. नवे डेव्हिस कर्णधार महेश भूपती याने एप्रिलमध्ये उजबेकिस्तान विरोधात बंगळुरूत झालेल्या सामन्यात त्याला संघात सहभागी केले नव्हते. पेसला डेव्हिस कप इतिहासात सर्वात जास्त दुहेरी सामने जिंकणारा खेळाडू बनण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. आता २०१८ मध्ये तो निकोला पीट्रांजेली याचा विक्रम तोडू शकतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल.१पुण्यातील अंतिम लढत रामकुमार व युकीत झाली. मात्र एआयटीए किमान पाच चॅलेंजर स्पर्धा खेळवण्यात अपयशी ठरली आहे. भारतात टेनिससाठी पैसे गोळा करणे कठीण आहेत. मात्र एमएसएलटीए सलग कॉर्पोरेट आणि सरकारच्या साहाय्याने याचे आयोजन करत आहे.२ एमएसएसटीएने महिलांसाठी सहा स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यात एक डब्ल्यूटीए स्पर्धेचाही समावेश आहे. त्यासोबतच पुरुष चॅलेंजर व फेब्रुवारीतील डेव्हिस कप सामना झाला. याच महिन्यात पुण्यामध्ये एटीपीची स्पर्धासुद्धा होणार आहे. 

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Flashback 2017फ्लॅशबॅक 2017