ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 16:19 IST2019-01-25T16:15:42+5:302019-01-25T16:19:58+5:30
दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती.

ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'!
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ओपन : दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत नोव्हाक जोकोव्हीचने विजय मिळवला. त्यामुळे 2019च्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना हा राफेल नदाल विरुद्ध जोकोव्हीच असा होणार आहे. 2019च्या टेनिस हंगामातील पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीतील ही Golden Match आहे.
Finally.
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2019
The rematch of the longest Grand Slam final in tennis history is here.#AusOpenpic.twitter.com/7VtKTkxGD6
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोव्हीचने फ्रान्सच्या लुकास पौईलेचे आव्हान 6-0, 6-2, 6-2 असे सहज संपुष्टात आणले.
Masterclass 💯@DjokerNole def. Lucas Pouille 6-0 6-2 6-2 in one hour and 23 minutes to advance to his seventh #AusOpen final. pic.twitter.com/LwJT5J4BFB
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2019
स्पेनच्या राफेल नदालने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपासला 6-2, 6-4, 6-0 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका आणि चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
Who are you supporting at #AusOpen finals weekend...@Petra_Kvitova or @Naomi_Osaka_? @RafaelNadal or @DjokerNole? pic.twitter.com/ePrfW8CUwp
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2019
Novak Djokovic vs Rafael Nadal in #AusOpen 2019 final
— Mohandas Menon (@mohanstatsman) January 25, 2019
In 2012 final: Djokovic beat Nadal 5–7, 6–4, 6–2, 6–7, 7–5