शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्सचा धक्कादायक पराभव, चीनच्या वांग कियाँगने नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 4:35 AM

सेरेना विलियम्सला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्य विश्वविक्रमाची बरोबरी करण्यातासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागेल.

मेलबोन : विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या सेरेना विलियम्सला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्य विश्वविक्रमाची बरोबरी करण्यातासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागेल. आॅस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्याच फेरीत शुक्रवारी चीनची वांग कियाँग हिने सेरेनाचा धक्कदायक पराभव केला. २७ वी मानांकित कियाँगने या दिग्गज खेळाडूवर ६-४, ६-७, ७-५ असा विजय मिळवत स्पर्धेत खळबळ माजवली.सेरेनाने येथे सातवेळा जेतेपद पटकविले आहे. मात्र २००६ ला तिसºया फेरीत बाहेर पडल्यानंतर आता यंदा पुन्हा एकदा पराभवाची पुनरावृत्ती झाली. त्याचवेळी जपानची गतविजेती नाओमी ओसाका हिलाही अनपेक्षित पराभवासह स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेची युवा १५ वर्षीय खेळाडू कोको गॉफने आपला शानदार फॉर्म कायम राखताना नाओमीला ६-३, ६-४ असे सहजपणे नमविले. यूएस ओपनमध्ये नाओमीने कोकोला सहज नमवले होते आणि यासह या पराभवाचा वचपाही कोकोने काढला. (वृत्तसंस्था)२४ वे ग्रँडस्लॅम लवकरच जिंकेन!‘आॅस्ट्रेलियन ओपनच्या तिसºया फेरीत पराभव झाला असला, तरी मी २४ वे ग्रँडस्लॅम लवकरच जिंकू शकते,’ असा निर्धार सेरेनाने व्यक्त केला. ३८ वर्षांच्या सेरेनाने २०१७ ला गर्भवती असताना आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकविले होते. त्यानंतर तिने चार ग्रँडस्लॅमच्या सलामीला हार पत्करली. ती म्हणाली,‘मी फार चुका केल्या. व्यावसायिक खेळाडू या नात्याने अशा चुका करायला नको होत्या. मी विजय मिळवू शकते, अशी खात्री होती अन्यथा खेळले नसते.’ आता पुन्हा एकदा नव्या निर्धाराने सेरेना पुढील ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होईल.जोकोविचची आगेकूचसर्बियाचा जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीत चौथी फेरी गाठली. गतविजेत्या जोकोविचने जपानच्या योशिहितो निशिओकाचा ६-३, ६-२, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्याचवेळी स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररला मात्र चौथी फेरी गाठण्यासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. आॅस्टेÑलियाच्या जॉन मिलमॅनविरुद्ध फेडररला ४-६, ७-६(२), ६-४, ४-६, ७-६(१०-८) अशी तब्बल ४ तास ३ मिनिटांची झुंज द्यावी लागली.वोज्नियाकीने केले गुडबायजागतिक क्रमवारीतील माजी अव्वल टेनिसपटू कॅरोलिन वोज्नियाकीचा तिसºया फेरीत ट्युनिशियाच्या ओंस जाबुरविरुद्ध ५-७, ६-३, ५-७ असा पराभव झाला. या पराभवानंतर तिने भावनिक होत टेनिसविश्वाला गुडबाय केले. आपल्या कारकिर्दीतील ही अखेरची स्पर्धा असेल, असे कॅरोलिनने डिसेंबरमध्येच स्पष्ट केले होते. ३० डब्ल्यूटीए विजेतेपद पटकावलेल्या कॅरोलिनने २०१८ साली आॅस्टेÑलियन ओपन हे एकमेव ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. सामना संपल्यानंतर कॅरोलिनला अश्रू अनावर झाले.

 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन