ऑस्ट्रेलियन ओपन : चीनच्या शुआई झँगचा पिछाडीवरुन विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 14:37 IST2018-01-15T13:57:48+5:302018-01-15T14:37:02+5:30
अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टिफन्स हिच्यावर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली.

ऑस्ट्रेलियन ओपन : चीनच्या शुआई झँगचा पिछाडीवरुन विजय
मेलबोर्न - अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टिफन्स हिच्यावर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली. चीनच्या शुआई झँग हिने २-६, ४-५ अशा पिछाडीवरुन मुसंडी मारत तिला २-६, ७-६(७-२), ६-२ अशी मात केली.
या स्पर्धेसाठी स्टिफन्सला 13 वे मानांकन देण्यात आले होते तर झँगला मानांकन नव्हते. गेल्या ऑगस्टमध्ये स्लोन स्टिफन्सने अनपेक्षितरित्या यू.एस.ओपन स्पर्धा जिंकली होती मात्र त्यानंतर आठ सामन्यांपैकी एकही सामना ती जिंकू शकलेली नाही.
विल्यम्स भगिनींशिवाय 21 वर्षानंतर प्रथमच
व्हिनसच्या पराभवामुळे 1997 नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 21 वर्षात प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत एकही विल्यम्स (सेरेना किंवा व्हिनस) भगिनी नसेल.