Australian Open 2026: जिद्दी अल्काराझची झुंजार खेळी; रोमहर्षक सेमीफायनल जिंकत गाठली फायनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:10 IST2026-01-30T15:05:27+5:302026-01-30T15:10:47+5:30
पहिल्या दोन सेटमध्ये आक्रमक खेळीसह अपेक्षित सामन्यात आघाडी घेतल्यावर मागे पडला, पण...

Australian Open 2026: जिद्दी अल्काराझची झुंजार खेळी; रोमहर्षक सेमीफायनल जिंकत गाठली फायनल
Australian Open 2026 : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये स्पेनचा युवा कार्लोस अल्काराज आणि अनुभवी जर्मन स्टार अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात काँंटे की टक्कर पाहायला मिळाली. टेनिस जगतातील अव्वल मानांकित कार्लोस अल्काराझ याने थरारक आणि ऐतिहासिक पुनरागमन करत अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. तब्बल ५ तास २७ मिनिटे चाललेल्या या मॅरेथॉन लढतीत अल्कराजने ६-४, ७-६(५), ६-७(३), ६-७(४), ७-५ असा विजय मिळवत फायनल गाठली.
क्रॅम्प्स आणि दुखापतीवर मात करत जिंकला हातून निसटतोय असे वाटणारा सामना
Longest semifinal in Australian Open history 🙌 https://t.co/IT1ZlJHpvu
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2026
या सामन्यात अल्काराझला तीव्र क्रॅम्प्स आणि दुखापतीचा सामना करावा लागला. सामन्यादरम्यान त्याने उपचार घेतले, इतकेच नव्हे तर पिकल ज्यूसचीही मागणी केली होती. जवळपास साडे पाच तास चाललेल्या लढतीत जाणवणारा शारीरिक थकवा आणि वेदना सहन करत सामना हातून निसटतोय असे वाटत असताना अफलातून जिद्दीनं खेळत त्याने आपलं अधिराज्य कायम राखलं.
Australian Open : "उह-आया…" आवाजावर आक्षेप! पंचांच्या निर्णयामुळे सेमीफायनलमध्ये हायहोल्टेज ड्रामा
फायनलमध्ये कुणाशी होणार लढत?
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये यानिक सिन्नप (सलग दोन वेळा विजेता) आणि नोवाक जोकोविच (मेलबर्नचा १० वेळचा बादशहा) यांच्यात रंगणार आहे. या दोघांमधील विजेता फायनलमध्ये अल्कराजला भिडेल. अवघ्या २२ व्या वर्षी अल्काराझ करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा इतिहासातील सर्वात तरुण पुरुष टेनिसपटू ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह तो महान टेनिसपटू राफेल नदाललाही मागे टाकू शकतो. यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तो हा इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.