अँडी मरेचा पराभवाने अलविदा, पहिली फेरी गमावण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 18:08 IST2019-01-14T18:08:02+5:302019-01-14T18:08:33+5:30

ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे मरेने स्पष्ट केले होते.

Andy Murray's lost his last match in carrier, the disappointment of losing the first round | अँडी मरेचा पराभवाने अलविदा, पहिली फेरी गमावण्याची नामुष्की

अँडी मरेचा पराभवाने अलविदा, पहिली फेरी गमावण्याची नामुष्की

मेलबर्न : ग्रेट ब्रिटनला पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद जिंकवून देणाऱ्या टेनिसपटू अँडी मरेला अखेर पराभवाने अलविदा करावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे मरेने स्पष्ट केले होते. पण या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मरेला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत मरेला स्पेनच्या रॉबर्टो बाऊटिस्टा अग्युटने 6-4, 6-4, 6-7, 6-7, 6-2 असे पराभूत केले.



 

रॉबर्टोने पहिल्या दोन सेट्समध्ये मरेला 6-4, 6-4 असे सहज नमवले. यावेळी रॉबर्टो हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण यानंतर मरेने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मरेने त्यानंतरचे दोन्ही सेट्स टायब्रेकरमध्ये जिंकले. दोन सेट्स जिंकत मरेने सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली होती. आता हा सामना मरे सोडणार नाही, असे म्हटले जात होते. पण पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मरेला अपेक्षित खेळ करता आला नाही. पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने मरेचे स्पर्धेतील आव्हान आणि कारकिर्दही संपुष्टात आली आहे.



 



 



 



 

Web Title: Andy Murray's lost his last match in carrier, the disappointment of losing the first round