अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 02:54 IST2020-09-02T02:53:43+5:302020-09-02T02:54:32+5:30

2020 US Open : जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू असलेला जोकोविच १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४आणि ६-१ ने सहज पराभव केला.

2020 US Open: Djokovic, Osaka in the second round | अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत

न्यूयार्क : सर्बियाच्या नोवाक जोकोविचने आपले विजय मोहिम कायम राखताना युएस ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या किशोरी कोको गॉफ हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. २०१८ ची महिला चॅम्पियन नाओमी ओसाका हिने जपानच्याच मिसाकी दोइ हिचा तीन सेटमध्ये पराभव केला. तिने जगातील ८१ व्या नंबरच्या खेळाडूचा ६-२, ५-७ आणि ६-२ ने पराभव केला.

जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत
दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४ आणि ६-१ ने सहज पराभव केला. अशाप्रकारे त्याने यावर्षीचा विक्रम २४-० असा केला. त्याने यापूर्वी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धाही जिंकलेली आहे.

सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की, मी माझी विजयाची मोहिम कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु, असे नाही की प्रत्येक दिवस हा तुमचाच असतो. विजयाची मालिका माझ्यासाठी प्रेरणा जरुर आहे.

Web Title: 2020 US Open: Djokovic, Osaka in the second round