जिओची नवी ऑफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 21:03 IST2017-12-26T21:03:00+5:302017-12-26T21:03:34+5:30

ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे विविध कंपन्याच्या  ऑफर्सचा पाऊस पडत आहे. अशीच हटके ऑफर 'जिओ'नंही दिली आहे

Zia's new offer, available at Rs. 3300 cashback | जिओची नवी ऑफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक

जिओची नवी ऑफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक

मुंबई - ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे विविध कंपन्याच्या  ऑफर्सचा पाऊस पडत आहे. अशीच हटके ऑफर 'जिओ'नंही दिली आहे. काल 25 डिसेंबर रोजी जिओनं ग्राहकांसाठी 399ची 'सरप्राईज कॅशबॅक'ची ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये 399चा रिचार्ज केल्यावर 3300 रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळणार आहे.  दोन दिवसांआधी रिलान्यस जिओनं आपल्या ग्राहकांसाठी 199 आणि 299 ची मंथली रिचार्ज ऑफर जाहीर केली. 

या बरोबरच जिओ ग्राहकांसाठी नवीन वर्षाची बंपर ऑफर आणण्याच्याही तयारीत आहे. जिओच्या या नवीन प्लानचं नाव 'हॅप्पी न्यू ईयर 2018' असं असणार आहे.

असा मिळणार 3300 रुपयांचा कॅशबॅक
400 रुपयांचं my-jio कॅशबॅक व्हॉऊचर, वॉलेटमधून 300 रुपयांचा कॅशबॅक आणि ई-कॉमर्स प्लेअरमधून 2600 रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीही जर जिओग्राहक असाल तर या ऑफरचा नक्कीच फायदा घेई शकता.

Web Title: Zia's new offer, available at Rs. 3300 cashback

टॅग्स :Jioजिओ