शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठीही पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 6:40 PM

तुम्ही युट्यूबवर (YouTube) व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. 

नवी दिल्ली : या जगात फुकटात काहीही मिळत नाही, अशी एक म्हण आहे. इंटरनेटच्या जगात ही म्हण रोज वापरली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत इंटरनेटवर भरपूर कंटेंट मोफत उपलब्ध होता. पण आता तशी परिस्थिती नाही. हळूहळू, आता सर्व प्रकारचा कंटेंट प्रीमियम होत आहे आणि  कंटेंटसाठी युजर्सकडून पैसे आकारले जात आहेत. दरम्यान, तुम्ही युट्यूबवर (YouTube)  व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. 

लवकरच तुम्हाला YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील. YouTube प्रीमियमची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. प्रीमियम सेवेअंतर्गत, YouTube च्या युजर्सना जाहिरात मुक्त सेवा मिळते. याशिवाय बॅकग्राउंडमध्ये म्युजिक प्ले करण्याचा ऑप्शन मिळत आहे, मात्र आता यामध्येही मोठा बदल होणार आहे. आता तुम्हाला YouTube चे 4K व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

सध्या YouTube वर युजर्स 4K रिझोल्युशनचे व्हिडीओ जाहिरातीसह मोफत पाहतात, मात्र लवकरच ही सेवा बंद होणार आहे. दरम्यान, संदर्भात YouTube ने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र, काही युजर्सचे म्हणतात की, ते सध्या फक्त 1440 पिक्सेल व्हिडिओ विनामूल्य पाहू शकतात. 2140 पिक्सेलपेक्षा जास्त व्हिडिओंसाठी, प्रीमियम सेवा घेण्यास सांगितले जात आहे.

जर YouTube साठी पैसे मोजावे लागले तर हा निर्णय युजर्सना चांगलाच महागात पडणार आहे, कारण आज भारतीय बाजारपेठेत भरपूर 4K टीव्ही आहेत. तुम्हाला शहरांमधील प्रत्येक घरात 4K टीव्ही मिळेल आणि लोक या टीव्हीवर फक्त 4K व्हिडिओ पाहतात. YouTube च्या या निर्णयानंतर त्यांना अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारखे YouTube च्या व्हिडिओसाठीसाठी पैसे द्यावे लागतील. 

याशिवाय, YouTube कोणत्याही व्हिडिओपूर्वी अशा 10 जाहिराती देण्याची तयारी करत आहे, ज्या स्किप करता येणार नाहीत. दरम्यान, YouTube प्रीमियमचा बेसिक प्लॅन एका महिन्यासाठी 129 रुपयांचा आहे. त्याचवेळी, तीन प्लॅनची ​​किंमत 399 रुपये आहे आणि वार्षिक प्लॅन 1,290 रुपयांचा आहे. प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सचा व्हिडिओ डाउनलोड करण्याचा पर्याय देखील मिळतो.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान