शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

YouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 5:27 PM

YouTube Launches ‘Super Thanks’ : एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी 'सुपर थँक्स' खरेदी करू शकतात.

नवी दिल्ली : व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने (YouTube) एक नवीन सुपर थँक्स (Super Thanks) फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरद्वारे युजर्स आपल्या आवडत्या YouTube चॅनेलला टिप देऊ शकतात. हे फीचर व्हिडिओ क्रिएटर्सला पैसे कमविण्यास मदत करणार आहे. (YouTube Launches ‘Super Thanks’ Money-Making Feature to Attract Creators)

एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी 'सुपर थँक्स' खरेदी करू शकतात. निवेदनात म्हटले आहे की, “ हे अतिरिक्त बोनस म्हणून, त्यांना अ‍ॅनिमेटेड जीआयएफ दिसेल आणि त्यांच्या खरेदीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगळ्या, रंगीबेरंगी टिप्पणीचा पर्याय मिळेल, ज्याचे क्रिएटर्स सहजपणे उत्तर देऊ शकतात.” दरम्यान, सुपर थँक्स फीचर सध्या 2 डॉलर आणि 50 डॉलरमध्ये उपलब्ध आहे.

68 देशात उपलब्ध आहे फीचरहे फीचर बीटा टेस्टिंग टप्प्यात होते आणि आता ते हजारो क्रिएटर्ससाठी उपलब्ध होईल. "हे फीचर 68 देशांमधील डेस्कटॉप आणि मोबाइल डिव्हाइस (Android आणि iOS) वर क्रिएटर्स आणि दर्शकांसाठी उपलब्ध आहे. काही सूचनांचे पालन करून क्रिएटर्स पाहू शकतात की, त्यांच्याजवळ याचा सुरूवातीचा अॅक्सेस आहे की नाही. जर त्यांच्याजवळ आत्ताचा अॅक्सेस  नसेल तर घाबरू नका, आम्ही या वर्षाच्या शेवटी YouTube भागीदारी कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र क्रिएटर्ससाठी उपलब्धता वाढवित आहोत", असे युट्यूबने म्हटले आहे. 

क्रिएटर्ससाठी पैसे कमविण्याची आणखी एक पद्धतयूट्यूबचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी सांगितले की, "युट्यूबवर आम्ही नवीन पद्धतींचा शोध घेत असतो. ज्यामुळे क्रिएटर्स आपल्या उत्पन्नामध्ये विविधता आणतील. त्यामुळे मी पेमेंट्सवर आधारित सुपर थँक्स सुरू करण्याबद्दल उत्साहित आहे. हे नवीन फीचर क्रिएटर्सला पैसे कमावण्याची आणखी एक पद्धत देत आहे. यामुळे दर्शकांसोबत असलेले त्यांचे संबंध दृढ देखील होते".

यूट्यूब सुपर चॅट (2017 मध्ये सुरुवात) आणि सुपर स्टिकर्स (2019 मध्ये सुरूवात) यासारखी फीचर्सच्या देखील सुविधा आहेत. सुपर चॅट हा हायलाइट केलेला संदेश आहे, जो क्रिएटर्सचे अधिक लक्ष आकर्षित करण्यासाठी गर्दीतून वेगळा दिसतो. सुपर चॅट पाच तास चॅटच्या शीर्षस्थानी असते. तसेच, सुपर स्टिकर्स दर्शकांना लाइव्ह स्ट्रीम आणि प्रीमिअरच्यावेळी क्रिएटर्सकडून स्टिकर विकत घेण्यास अनुमती देतात.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायMONEYपैसा