YouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:27 PM2021-07-21T17:27:29+5:302021-07-21T17:28:06+5:30

YouTube Launches ‘Super Thanks’ : एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी 'सुपर थँक्स' खरेदी करू शकतात.

YouTube Launches ‘Super Thanks’ Money-Making Feature to Attract Creators | YouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी! 

YouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी! 

Next

नवी दिल्ली : व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने (YouTube) एक नवीन सुपर थँक्स (Super Thanks) फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरद्वारे युजर्स आपल्या आवडत्या YouTube चॅनेलला टिप देऊ शकतात. हे फीचर व्हिडिओ क्रिएटर्सला पैसे कमविण्यास मदत करणार आहे. (YouTube Launches ‘Super Thanks’ Money-Making Feature to Attract Creators)

एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी 'सुपर थँक्स' खरेदी करू शकतात. निवेदनात म्हटले आहे की, “ हे अतिरिक्त बोनस म्हणून, त्यांना अ‍ॅनिमेटेड जीआयएफ दिसेल आणि त्यांच्या खरेदीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगळ्या, रंगीबेरंगी टिप्पणीचा पर्याय मिळेल, ज्याचे क्रिएटर्स सहजपणे उत्तर देऊ शकतात.” दरम्यान, सुपर थँक्स फीचर सध्या 2 डॉलर आणि 50 डॉलरमध्ये उपलब्ध आहे.

68 देशात उपलब्ध आहे फीचर
हे फीचर बीटा टेस्टिंग टप्प्यात होते आणि आता ते हजारो क्रिएटर्ससाठी उपलब्ध होईल. "हे फीचर 68 देशांमधील डेस्कटॉप आणि मोबाइल डिव्हाइस (Android आणि iOS) वर क्रिएटर्स आणि दर्शकांसाठी उपलब्ध आहे. काही सूचनांचे पालन करून क्रिएटर्स पाहू शकतात की, त्यांच्याजवळ याचा सुरूवातीचा अॅक्सेस आहे की नाही. जर त्यांच्याजवळ आत्ताचा अॅक्सेस  नसेल तर घाबरू नका, आम्ही या वर्षाच्या शेवटी YouTube भागीदारी कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र क्रिएटर्ससाठी उपलब्धता वाढवित आहोत", असे युट्यूबने म्हटले आहे. 

क्रिएटर्ससाठी पैसे कमविण्याची आणखी एक पद्धत
यूट्यूबचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी सांगितले की, "युट्यूबवर आम्ही नवीन पद्धतींचा शोध घेत असतो. ज्यामुळे क्रिएटर्स आपल्या उत्पन्नामध्ये विविधता आणतील. त्यामुळे मी पेमेंट्सवर आधारित सुपर थँक्स सुरू करण्याबद्दल उत्साहित आहे. हे नवीन फीचर क्रिएटर्सला पैसे कमावण्याची आणखी एक पद्धत देत आहे. यामुळे दर्शकांसोबत असलेले त्यांचे संबंध दृढ देखील होते".

यूट्यूब सुपर चॅट (2017 मध्ये सुरुवात) आणि सुपर स्टिकर्स (2019 मध्ये सुरूवात) यासारखी फीचर्सच्या देखील सुविधा आहेत. सुपर चॅट हा हायलाइट केलेला संदेश आहे, जो क्रिएटर्सचे अधिक लक्ष आकर्षित करण्यासाठी गर्दीतून वेगळा दिसतो. सुपर चॅट पाच तास चॅटच्या शीर्षस्थानी असते. तसेच, सुपर स्टिकर्स दर्शकांना लाइव्ह स्ट्रीम आणि प्रीमिअरच्यावेळी क्रिएटर्सकडून स्टिकर विकत घेण्यास अनुमती देतात.

Web Title: YouTube Launches ‘Super Thanks’ Money-Making Feature to Attract Creators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app