गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा अखेर पूर्ववत
By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 17:58 IST2020-12-14T17:42:19+5:302020-12-14T17:58:25+5:30
जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत होती.

गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा अखेर पूर्ववत
मुंबई
इंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या 'गुगल'च्या सर्व सेवा ४५ मिनिटांच्या व्यत्ययानंतर अखेर पूर्ववत झाल्या आहेत. गुगलच्या जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल चॅट, गुगल हँगाऊटसह इतर सेवा ठप्प झाल्या होत्या.
डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा भारतीय वेळेनुसार ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ठप्प झाल्या होत्या. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत होती. दरम्यान, 'गुगल'कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
'जीमेल'वर '५०० एरर'
गेल्या अर्ध्यातासापासून जीमेवर लॉगइन करण्याचा प्रयत्न करताना Temporary Error (500) असा मेसेज दाखवत होता. यामुळे जीमेलचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.
'यूट्यूब'ही वापरता येईना
इंटरनेट जगातील सुप्रसिद्ध व्हिडिओ व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या 'यूट्यूब'वरही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचा मेसेज दाखवत होता. यूट्यूबचे होमपेज सुरू होत नसल्यानं वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहता येत नव्हते. यासोबतच व्हिडिओ अपलोडही पूर्णपणे ठप्प झाले होते.