शरीरातील उष्णतेने चार्ज होईल तुमचा फोन; आयआयटी मंडीतील संशोधकांना मिळाले मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 09:53 AM2024-02-14T09:53:06+5:302024-02-14T09:53:46+5:30

थर्मोइलेक्ट्रिक प्रणालीद्वारे उष्णतेचे विजेमध्ये किंवा विजेचे उष्णतेमध्ये रूपांतर केले जाऊ शकते

Your phone will be charged by body heat; Researchers at IIT Mandi have achieved great success | शरीरातील उष्णतेने चार्ज होईल तुमचा फोन; आयआयटी मंडीतील संशोधकांना मिळाले मोठे यश

शरीरातील उष्णतेने चार्ज होईल तुमचा फोन; आयआयटी मंडीतील संशोधकांना मिळाले मोठे यश

शिमला : आयआयटी मंडीतील संशोधकांनी एक असे उपकरण तयार केले आहे ज्याद्वारे शरीरातील उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करून स्मार्टफोनसारख्या उपकरणांना चार्ज करता येईल. या उपकरणाचा अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात दूरगामी परिणाम होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

संस्थेचे संशोधन जर्मनीच्या अँजेवेंटे केमी या विज्ञान नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनाचे नेतृत्व आयआयटी मंडीच्या स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अजय सोनी यांनी केले आहे. त्यांनी थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर कसे कार्य करते हे स्पष्ट केले आहे. 

स्मार्टफोनसोबत चार्जरची गरज आता संपली

थर्मोइलेक्ट्रिक प्रणालीद्वारे उष्णतेचे विजेमध्ये किंवा विजेचे उष्णतेमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. 
डिव्हाइसमुळे आता स्मार्टफोनसोबत चार्जर ठेवण्याची गरज नाही.
उपकरण हातात ठेवल्याने फोन चार्ज होईल. 
स्मार्टफोन व्यतिरिक्त, लॅपटॉप, इअरबड्ससह इतर अनेक उपकरणे देखील डिव्हाइसमधून चार्ज केली जाऊ शकतात.

नेमके काय केले?
संशोधकांच्या टीमने सिल्व्हर टेल्युराइड नॅनोवायरपासून थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूल बनवले. मानवी स्पर्शानंतर डिव्हाइस आउटपुट व्होल्टेज देण्यास सुरुवात करते. हे कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करण्यास सक्षम आहे. 

फक्त उष्णता...
प्रोफेसर सोनी म्हणतात की त्यांच्या टीमने विकसित केलेले मॉड्यूल मानवी शरीराव्यतिरिक्त विविध उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करू शकते. उदाहरणार्थ, कारचे बोनेट गरम झाल्यावर त्यातून ऊर्जा निर्माण करता येते. त्याचप्रमाणे पाणी फेकणाऱ्या पंपाच्या उष्णतेतूनही ऊर्जा निर्माण करता येते.

Web Title: Your phone will be charged by body heat; Researchers at IIT Mandi have achieved great success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.