WhatsApp वर टाईप करण्याची गरज नाही, फक्त बोलून असा पाठवा मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 11:45 IST2019-01-16T10:55:02+5:302019-01-16T11:45:01+5:30
WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येणार आहे.

WhatsApp वर टाईप करण्याची गरज नाही, फक्त बोलून असा पाठवा मेसेज
नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अनेकदा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांना WhatsApp वर टाईप करून मेसेज पाठवायला कंटाळा येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येतो. हे फीचर Android आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.
WhatsApp वर कीबोर्डमध्ये माइकचा आयकॉन देण्यात आला आहे. Dictation फीचर हे गुगल असिस्टेंट आणि Siri यासारख्या व्हॉइस असिस्टेंट्समध्ये आधीपासूनच आहे. WhatsApp मध्ये हे फीचर आता बिल्ट-इन आहे. कोणताही युजर्स कीबोर्डमधून दिलेल्या माइकवर क्लिक करून जे बोलायचे आहे ते बोलून मेसेजद्वारा दुसऱ्याला पाठवू शकता.
WhatsApp वर फक्त बोलून असा पाठवा मेसेज
- Dictation फीचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.
- ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीच्या नंबरवर क्लिक करा.
- कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर टाइप करण्यासाठी जसा कीबोर्ड ओपन करतो तसा तो ओपन करा.
- Android मोबाइलच्या युजर्सला WhatsApp वर काळ्या रंगाचा माइक वरच्या बाजुला दिसेल. तर आयओएस युजर्सला हा माइक खालच्या बाजूला दिसेल.
- मेसेज पाठवण्यासाठी त्या माइकवर क्लिक करा. त्यानंतर जो मेसेज पाठवायचा आहे ते बोला.
- ज्या भाषेत तुम्ही बोलाल त्या भाषेत तो मेसेज आपोआप टाइप होईल. मेसेज पूर्ण झाल्यानंतर सेंड बटनवर क्लिक करून तो पाठवता येऊ शकतो.
- WhatsApp वर मेसेज चुकल्यास तो एडीटचा पर्याय देण्यात आला आहे.
- WhatsApp वर मोठा मेसेज टाईप करण्यासाठी खूप वेळ जातो. मात्र या फीचरमुळे आता हा वेळ वाचणार आहे.